सध्या ओटीटीची खूप चलती आहे. ओटीटी नेहमीच वेगवेगळ्या विषयांचे अनेक चित्रपट व वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. गेल्या वर्षी अनेक चित्रपट व वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. आता ओटीटी व्ह्यूअरशिपच्या लिस्टबद्दल जाणून घेऊया. म्हणजेच ६ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये भारतात बघितल्या गेलेल्या कोणत्या ओरिजनल वेबसीरिज आहेत? ते जाणून घ्या. तसेच या लिस्टमध्ये कोणती वेबसीरिज अधिक चालली आणि कोणती वेबसीरिज सर्वात पिछाडीवर आहे? त्याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. दरम्यान समोर आलेल्या लिस्टमध्ये नेटफ्लिक्सच्या तीन वेबसीरिजचा समावेश आहे. यामध्ये एका डॉक्युमेंट्रीचादेखील समावेश आहे. (top 10 webseries)
दक्षिण कोरियन वेबसीरिज ‘स्क्विड गेम’चा दूसरा भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेबसीरिजला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. यामध्ये यामध्ये सगळे जण खेळ खेळत असून यामध्ये खूनखराबा दाखवण्यात आला आहे. दुसऱ्या भागामध्ये खूप सस्पेन्स ठेवला आहे. त्यामुळे आता लोक तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आली आहे. या सीरिजला आजवर ४.६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
सध्या क्राइम-ड्रामा व थ्रीलर शो ‘ब्लॅक वॉरंट’ ही सीरिज नुकतीच भेटीला आला आहे. या सीरिजमध्ये जहान गुप्ता, राहुल भट्ट, परमवीर सिंह चिमा व अनुराग ठाकूरदेखील आहेत. ही सीरिज १० जानेवारी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. ही सीरिज ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भेटीस आली होती. ही सीरिज आजवर २.३ मिलियन लोकांनी बघितली आहे.
सध्या ओटीटीवर ‘शार्क टॅंक इंडिया’ हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये ज्यांना स्वतःचा स्टार्टअप करायचा आहे तसेच स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं आहे त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये अनेक उद्योजक कल्पना घेऊन येतात. हा शो प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडत आहे. दूसरा सीजन लोकांच्या खूप पसंतीस पडला आहे. हा शो ‘सोनी लिव्ह’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भेटीस येतो. आजवर हा शो ३.३ मिलियन लोकांनी पाहिला आहे.
‘गुनाह : २’ ही सीरिजदेखील खूप चर्चेत राहिली आहे. यामध्ये अभिमन्युची गोष्ट बघायला मिळत आहे. यामध्ये क्राइम व थ्रीलर बघायला मिळत आहे. या सीरिजचा पहिला भाग खूप पसंत केला गेला आहे. ‘बीस्ट गेम्स’ हा एक रिअलिटी कॉम्पिटिशन शो आहे. यामध्ये प्रसिद्ध युट्यूबर जीमी म्हणजेच ‘मिस्टर बीस्ट’ दिसून येत आहे. त्याच्याबरोबर त्याचे काही पार्टनरदेखील आहेत. एक हजार लोक ५ मिलियन डॉलरचे बक्षीस जिंकण्यासाठी खेळ खेळतात. ‘स्क्विड गेम’ पासून या गेमची प्रेरणा घेतली असल्याचे समोर आले आहे.