Bigg Boss 13 Fame Himanshi Khurana Admitted : ‘बिग बॉस १३’ या रिॲलिटी शोमध्ये दिसलेली पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना रुग्णालयात दाखल आहे. अभिनेत्रीने स्वतःच रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे पाहून चाहत्यांमध्ये काळजीच वातावरण पसरलं आहे. असं असलं तरी थेट इस्पितळातून तिने मेकअप करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यावर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. हिमांशी खुरानाने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. तिच्या हातात विगो असून ती मेकअप करत आहे.
हिमांशीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “काही उपयोग नाही, डॉक्टर फी कमी करणार नाही”. तर दुसऱ्याने असे लिहिले आहे की, “काहीही झाले तरी मुलींचं लिपस्टिक लावणं काही कमी होत नाही”. हिमांशीचा एक्स बॉयफ्रेंड असीम रियाजचा संदर्भ देत एका यूजरने लिहिले की, “असिम ब्रो, हिमांशीच्या तब्येतीबद्दल विचारा”. तर एका युजरने गंमतीत लिहिले की, “मेक-अप गेला नाही तरी मुली मरेपर्यंत मेकअप करतच राहतील”.
असीम आणि हिमांशीची भेट ‘बिग बॉस १३’ मध्ये झाल्याची माहिती आहे. तिथेच असीमने हिमांशीवरील प्रेम व्यक्त केले होते. त्यानंतर हिमांशी ९ वर्षांपासून कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये होती, मात्र तिने असीमसाठी त्याच्याबरोबर ब्रेकअप केले. नंतर हिमांशी आणि असीमचेही ब्रेकअप झाले. हिमांशीने तिला रुग्णालयात का दाखल केले याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही.
हिमांशीची तब्येत बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिने एकदा उघड केले की, ती पीसीओएसशी झुंजत होती, ज्याचा तिच्या करिअरवरही परिणाम झाला. आता अभिनेत्री इस्पितळात दाखल झाली असून तिला नेमकं काय झालं आहे याबाबत अद्याप काहीही समोर आले नसल्याने चाहते काळजी व्यक्त करताना दिसत आहेत.