Kranti Redkar Shared Video : बाप-मुलीचं नातं हे सर्व नात्यापैकी खास आहे. हे खास बॉण्ड आपल्याला अगदी प्रत्येक घरात पाहायला मिळतं. अशातच बाप-लेकीच्या खास बॉण्डचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री क्रांती रेडकरच्या मुलीचा आणि नवऱ्याचा खास बॉण्ड पाहायला मिळतोय. क्रांती रेडकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये समीर वानखेडे आणि त्यांची लेक पाहायला मिळत आहेत. क्रांती नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. बरेचदा ती तिच्या लेकीच्या गमतीजमती, आई झाल्यानंतरचे अनुभव शेअर करताना दिसते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रांती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. क्रांतीबरोबरच तिच्या दोन लेकी या चर्चेत असलेल्या पाहायला मिळतात. क्रांतीला जितकी लोकप्रियता मिळाली आहे त्याहून अधिक लोकप्रिय तिच्या लेकी आहेत. सोशल मीडियावरुन क्रांती नेहमीच तिच्या लेकींचे अनेक व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. अशातच क्रांतीने नवरा व लेकीचा एक सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये समीर त्यांच्या मुलीची विशेष काळजी घेताना दिसत आहेत.
समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये समीर लेकीला घेऊन बाहेर फिरायला गेलेले दिसत आहेत. यावेळी तिच्या शूजची लेस निघते तेव्हा ते स्वतः खाली बसून शूजची लेस बांधताना दिसत आहेत. “बाबा आणि चब्बू..बाप मुलींचे बंधन काही औरच असते. दुनिया एक तरफ और पापा की परी एक तरफ”, असं कॅप्शन देत क्रांतीने हा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – कपाळावर टिळा, बाप्पाचा गजर; सिद्धिविनायकाचे दर्शन घेताच हिना खान ट्रोल, नेटकरी म्हणाले, “मुस्लीम असून…”
क्रांती व समीर यांना दोन जुळ्या मुली आहेत. झिया व झिदा अशी त्यांच्या मुलींची नाव आहेत. लाडाने ती तिच्या लेकींना छबिल व गोदो अशी हाक देते. क्रांतीने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या वडिलांबरोबरच्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये बाप-लेकीचं अनोखं नातं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.
Video : लेकींवर समीर वानखेडेंचं जीवापाड प्रेम, क्रांती रेडकरेने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “पापा की परी…”