Neetu Kapoor Rishi Kapoor Wedding Incident : बॉलीवूडचे प्रसिद्ध जोडपे नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांनी पडद्यावर त्यांच्या अभिनय कौशल्याने खळबळ उडवून दिली. किंबहुना, या जोडीचे वैयक्तिक आयुष्याही खूप चर्चेत असलेलं पाहायला मिळालं आहे. त्यांची जोडी लोकांना खूप आवडली आहे. दोघांमध्ये अशा अनेक घटना घडल्या, ज्या बातम्या बनल्य आणि लोकांमध्ये चर्चेचा विषय बनल्या. त्यांचे लग्नही काही सामान्य नव्हते. नीतू व ऋषी यांच्या लग्नादरम्यानच्या अनेक रंजक गोष्टी पसरल्या होत्या. ज्याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला आहे. आज जरी ऋषी कपूर आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही.
नीतू कपूरने २००३ मध्ये ‘रेडिफ’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाचा एक मजेदार किस्सा सांगितला होता. त्यांचे लग्न बॉलीवूडच्या ड्रामापेक्षा कमी नसल्याचे त्यांनी सांगितले होते. केवळ कुटुंब आणि मित्रांनीच त्यांच्या विशेष प्रसंगी आनंद व्यक्त केला नाही तर अतिथी म्हणून प्रवेश करुन घुसखोरांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नीतू कपूर यांनी सांगितले होते की, बिन आमंत्रित पाहुण्यांनी सुंदर कागदात गुंडाळलेली भेट त्यांच्यासाठी कशी आणली होती.
हा किस्सा सांगत नीतू कपूर म्हणाले की, घुसखोरांनी नीतू व ऋषी यांच्या लग्नात येत त्यांना एक भेटवस्तूही दिली पण त्यांनी जेव्हा ती उघडली तेव्हा तो बॉक्स दगडांनी भरलेला होता. याशिवाय संगीत सोहळ्यात नुसरत फतेह अली खान पोहोचले होते, त्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. सासरे राज कपूर यांनी गायिकेला लग्नात परफॉर्म करण्यासाठी कसे बोलावले होते याबाबतही अभिनेत्रीने सांगितले.
नीतू कपूर यांनी असेही सांगितले होते की, लग्नात प्रचंड गर्दी आणि गोंगाटामुळे ऋषी कपूर घोड्यावर चढण्यापूर्वीच बेशुद्ध पडले होते. यानंतर अभिनेत्रीही बेशुद्ध झाली. त्यानंतर दोघांनी ब्रँडी पिऊन सातफेरे घेतले. २२ जानेवारी १९८० रोजी आरके हाऊसमध्ये झालेल्या लग्नाला पाच हजार लोक उपस्थित होते. अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, “माझ्या लग्नात खिसा मारणारे आले होते. त्यांनी मला भेटवस्तू दिली ज्याच्या आत चपला होत्या”.