छोट्या पडद्यावर सध्या मालिकांचं अनेक मालिकांचं वर्चस्व पाहायला मिळत. वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका, नवीन विषय यांसोबतच अनेक नवीन कलाकारांची देखील ओळख मनोरंजनाविश्वाला होत आहे. या मध्ये अनेक अभिनेते, अभिनेत्री यांच्या सोबतच अनेक बालकलाकारांचा देखील समावेश आहे. अशीच एक बालकलाकार झी मराठी वाहिनी वरील लोकमान्य या मालिकेत सुद्धा पाहायला मिळते आणि सेटवर तिच्या बडबडीने अनेकांची तोंड बंद होतात असं ही सेटवरील काही कलाकारांचं म्हणणं आहे. सेटवर सगळ्यांची बोलती बंद करणाऱ्या या बालकलाकाराचं नाव आहे बालकलाकार समायरा पाटील.(Spruha Joshi Lokmanya Serial)

लोकमान्य या मालिकेत अभिनेता क्षितिज दाते आणि अभिनेत्री स्पृहा वरद यांच्या सोबत कृष्णा हे पात्र सामायरा ही ३ वर्षाची चिमुरडी साकारत आहे. मालिकेच्या सेटवरच स्पृहा आणि समायराचा असंच एक गॉड व्हिडिओ सध्या वायरल होताना दिसतोय. मालिकेचे दिगदर्शक स्वप्नील वारके यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि या व्हिडिओला ” मला गप्प करणारी लोकमान्यच्या सेट वरची नटी. ” असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..
https://www.instagram.com/reel/Cr-3-gFANU_/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
स्पृहाने ही या आधी अनेकदा समयरा सोबतचे फोटोस आणि रील्स शेअर केले आहेत. प्रेक्षकांना ही समायराचा हा गोड अभिनय आवडताना दिसतोय. लोकमान्य या मालिकेत अभिनेता क्षितीज दाते हा लोकमान्य गंगाधर टिळक यांच्या मुख्य भूमिकेत दिसत आहे. तर अभिनेत्री स्पृहा ही लोकमान्य टिळक यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत आहे. तर काही दिवसांपूर्वी वासूदेव बळवंत फडके यांच्या भूमिकते अभिनेता सुयश टिळकची हे एन्ट्री मालिकेत पाहायला मिळाली होती.(Spruha Joshi Lokmanya Serial)
हे देखील वाचा –‘न सांगता एकांकिकेतून झालेली हकालपट्टी ते आज स्वतःच निर्माण केलेले स्थान’ वाचा फिल्टर पाड्याच्या बच्चन गौरव मोरेची स्ट्रगल स्टोरी