सामान्य माणसू किंवा चित्रपट, मालिका, नाटक यांमध्ये दिसणारा कलाकार कोणी असो रोजच्या जीवनात प्रत्येकालाच काही असे अनुभव मिळत असतात जे केवळ निखळ आनंद देऊन जातात. असंच एक सुखद आणि चेहऱ्यावर निखळ आनंद देऊन जाणारा आनंद झाला आहे अभिनेता कश्यप परुळेकरला. झी मराठी वरील नवा गडी नवं राज्य या लोकप्रिय मालिकेत राघव हे भूमिका करणाऱ्या कश्यप ने काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकल मधला एक व्हिडीओ पोस्ट केला होता.(Kashyap Parulekar Video Viral)
या व्हिडिओ मध्ये लोकलच्या डब्ब्यात कश्यप एकटाच होता आणि याच गोष्टीच त्यांना आश्यर्य वाटत होत. मुंबई सारख्या गर्दीच्या, धावपळीच्या ठिकाणी रिकामा लोकलचा डब्बा फार कमी वेळा पाहायला मिळतो आणि हे भाग्य या वेळी कश्यपला लाभल याचा आनंद त्याने व्हिडिओ पोस्ट करत प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे. प्रेक्षकांनी ही त्याच्या या व्हिडिओ वर ‘ चेक करा नाहीतर गाडी कार शेड ला जात असेल , ‘ असं कसं पण? शुटींग साठी रिकामी केली का, ‘ रमा पण आहे तुम्हाला दिसत नाही ‘ अशा अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

कश्यप सध्या झी मराठीवरील नवा गडी नवं राज्य या मालिकेत राघवया भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेत कश्यप सोबत आनंदीच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी तर त्याच्या मुलीच्या भूमिकेत बालकलाकार साईशा भोईर देखील पाहायला मिळते. शिवाय मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री अनिता दाते देखील रमा या प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद देखील पाहायला मिळतोय.(Kashyap Parulekar Video Viral)
हे देखील वाचा – आणि सेटवर मामांनी किंग खानला दिले होते अभिनयाचे धडे…