दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागाचैतन्यचा नुकताच शाही विवाहसोहळा पार पडला. अभिनेत्री शोभिता धूलिपालाबरोबर त्याने लग्न केले असून लग्नाचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हैद्राबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओ येथे त्यांचं लग्न थाटामाटात पार पडले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. लग्नाच्या वेळी अक्किनेनी कुटुंबं व मित्रपरिवार उपस्थित होते. चाहत्यांनी व मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चैतन्य आणि शोभिता यांनी लग्नसोहळ्यात खास पारंपारिक लुक केला होता. तसेच नागाचैतन्यच्या लूकनेदेखील लक्ष वेधून घेतलं आहे. (naga chitanya and shobhita dhulipala viral video)
नागा चैतन्य व शोभिता यांचा ४ डिसेंबर रोजी विवाह पार पडल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसून आले. लग्नंनंतर नवीन जोडपं आंध्रप्रदेश येथील श्री भ्रामरंभा सहिता मल्लिकार्जुन स्वामी देवस्थान मंदिरात पोहोचले. यावेळी त्यांचे काही फोटो व व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी वडील नागार्जुनदेखील दिसून आले. मंदिराबाहेरील त्यांचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली आहे.
समोर आलेल्या फोटोंमध्ये नवीन नवरी शोभिता एकदम साध्या लूकमध्ये दिसून येत आहे. मात्र तिचा हा साधेपणा अनेकांना आवडला नाही. एकाने प्रतिक्रिया देत म्हंटले की, “ही आता अशी दिसत आहे तर पुढे ही कशी दिसेल? तिच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव दिसत नाहीत”. त्यामुळे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. तर अनेकांना शोभिताचा हा साधा व पारंपारिक लूक चांगलाच आवडला आहे.
दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांची साखरपुडा झाला होता. एका खाजगी समारंभात झालेल्या या या सोहळ्यात दोघांचेही कुटुंब सहभागी झाले होते. अभिनेत्याचे वडील नागार्जुन यांनी लग्नाचे पहिले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हापासून चैतन्य आणि शोभिता कधी लग्नबंधनात अडकणार याची चाहत्यांना प्रतीक्षा होती.