झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. त्यातच आता भुवनेश्वरीच चारुलता म्हणून वावरत होती हेदेखील अक्षराने सगळ्यांसमोर आणलं आहे. भुवनेश्वरी इतके दिवस चारुलता म्हणून वावरत होती. तिच्यावर घरातल्या सगळ्यांनीही विश्वास ठेवला होता. पण अखेरीस भुवनेश्वरीचं सत्य अक्षरा उघड करते. त्यानंतरही भुवनेश्वरी स्वत:चा बचाव करते. “माझ्या जीवापेक्षा माझा लेक माझ्यासाठी जास्त प्रिय आहे. तुम्ही मला लाथाडलं पण मी अधिपतीसाठी इथे राहिली. तुम्ही झिडकारलंत तरी मी अधिपतीकडे बघून दिवस काढले,” असं ती चारुहासला म्हणते. (Navri Mile Hitlerla serial update)
यानंतर अधिपती “जे झालं ते झालं, आता सगळं विसरुन माफ करुया. तुमच्या मुलासाठी तरी हे लग्न मान्य करा” असं म्हणत चारुहासला हे लग्न करण्यासाठी विनवणी करतो. त्यानंतर मालिकेत अक्षराने बजरंगकडून हे कबूल करुन घेतलं की त्याने जे काही कृत्य केलं ते भुवनेश्वरीच्या सांगण्यावरुन केलं. “भुवनेश्वरी मॅडमनेच मला जेलबाहेर काढलं. त्यांनी मला जे जे सांगितलं, ते मी करत गेलो” अशी कबुली त्याने अक्षराला दिली. अशातच आता भुवनेश्वरीला अक्षराच्या वागण्याचा संशय आला आहे.
मालिकेचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात भुवनश्वरी चंचलाला असं म्हणते की, “तुम्ही अक्षरावर नजर ठेवा. २४ तास त्यांच्यावर घरात आणि घराबाहेर नजर ठेवा”. तर पुढे अधिपती अक्षराला असं म्हणतो की, “त्या बज्याचं (बजरंग) नाव माझ्यापुढे काढलं तरी माझं डोकं फिरत”. यावर अक्षराला अधिपतीला असं म्हणते की, “आता मी त्याचं नाव नाही तर जे काही खरं आहे ते तुमच्यासमोट आणणार आहे”. त्यांचं हे बोलणं चंचला ऐकते.
आणखी वाचा – “बुरखा घाल, नमाज पठण कर”, शाहरुख खानने पत्नी गौरीकडे केली मागणी, कुटुंबियांनाही बसला धक्का, नेमकं काय झालं?
यांनंतर भुवनेश्वरी चंचलाला असं म्हणते की, “सुनबाई आता खूप उडत आहेत, त्यांचे पंख छाटले पाहिजे”. यानंतर भुवनेश्वरी अधिपतीला घेऊन पोलिस ठाण्यात गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता अक्षरासमोर कबुली देणारा बजरंग आपल्या मतावर ठाम राहणार का? अक्षराला सांगितलेलं सत्य तो अधिपतीलाही सांगणार का? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. तसंच भुवनेश्वरीचा अक्षराला अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार का? हेही लवकरच पाहायला मिळणार आहे