सध्या सर्वत्र दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा २’ हा चित्रपट आज देशभरात तसेच परदेशातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अल्लूअर्जुन व रश्मिका मंदना यांची मुख्य भूमिका या चित्रपटांमध्ये बघायला मिळत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०२१ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले होते. अशातच आता दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. यामध्ये खलनायकाच्या भूमिकेत फाहाद फाजीलदेखील बघायला मिळणार आहे. समोर आलेल्या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुन तसेच फहादचे जबरदस्त डायलॉग ऐकायला मिळाले होते. तसेच ॲक्शन सीन, व्हीएफएक्स यामुळे प्रेक्षकांची उत्स्तुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळे पहिल्या दिवशी या चित्रपटाने काय कमाल केली आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. (Pushpa 2 Review)
‘पुष्पा’चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लू अर्जुन म्हणजे पुष्पा हा एक गरीब व्यक्ती असतो. काम करता करता तो चंदन तस्करीच्या व्यवसायात येतो. कालांतराने तो तस्कर व्यवसायातील राजा होतो. यादरम्यान त्याचे अनेक शत्रू निर्माण होतात. याचवेळी त्याची गाठ भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याशी पडते. चित्रपटाच्या शेवटी दोघांमध्ये वैर असलेलेही दाखवण्यात आले आहे. तसेच या भागांमध्ये तो श्रीवल्लीबरोबर लग्नदेखील करतो. या ठिकाणी पहिला भाग संपतो.
आता दुसऱ्या भागांमध्ये काय होणार? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती. दूसरा भाग प्रदर्शित झाला असून चाहत्यांनी ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’लादेखील हजेरी लावली. तसेच या चित्रपटाबद्दलचे त्यांचे मतदेखील व्यक्त केले आहे. एकाने ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “हा चित्रपट खूप मनोरंजक आहे. अल्लू अर्जुनचे संवाद तसेच त्याची एंट्री, स्वॅग सगळंच काही भारी. फहाद पुन्हा एकदा मस्तच. ‘पुष्पा २’ बघण्यासारखा आहे”.
POWER-PACKED ⭐️⭐⭐#Pushpa2TheRule all the elements of a pure commercial entertainer. @alluarjun has delivered the best performance and Entry & Swag with a mass Elevation,FAFA is back to back same നിർഗുണൻ no impact. #Pushpa2 WATCHABLE pic.twitter.com/AbRJL3eeHh
— MOHD JUNAID» (@Junuhere) December 5, 2024
तसेच अजून एकाने पोस्ट करत लिहिले की, “हा चित्रपट पुन्हा बघण्यासारखा आहे. याचा सीनेमॅटिक एक्सपिरियन्स खूप मस्त होता. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे”. तसेच अजून एका चाहत्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “खूप भारी. शेखावतची भूमिका एकदम लक्षवेधी आहे. यातील दोन गाणी चांगली वाटतात. सुकूमार यांचे काम खूप चांगले झाले आहे”.दरम्यान हा चित्रपट आता येणाऱ्या दिवसांत बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो? ही पाहण्यासारखे आहे. २०२१ साली आलेल्या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. या चित्रपटातील पुष्पा या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.