Shashank Ketkar Wedding Anniversary : लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मालिकांमुळे शशांकला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. सोशल मीडियावरही शशांक नेहमीच सक्रिय असतो. सामाजिक मुद्द्यांवर नेहमीच तो भाष्य करताना दिसतो. शिवाय तो त्याच्या वैयक्तिक कारणामुळेही बरेचदा चर्चेत राहतो. शशांक २०१७ साली प्रियंका ढवळेबरोबर लग्नबंधनात अडकला. आता हे कपल पालकत्वाचा टप्पा एन्जॉय करत आहेत. बायकोबरोबर फिरताना, वेळ घालवतानाच्या अनेक पोस्ट तो वेळोवेळी त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर करत असतो. अशातच काल अभिनेत्याच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली. याबाबत त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर खास पोस्ट शेअर केलेली पाहायला मिळाली.
शशांकने इंस्टाग्राम पोस्टद्वारे बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “फक्त ७ वर्ष झाली. बाकी सगळं जग एका बाजूला आणि तुझ्यावरचं प्रेम आणि तू एका बाजूला”, असं कॅप्शन देत शशांकने त्याच्या बायकोबरोबरच्या आठवणी शेअर केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये त्याने त्यांच्या लग्नातील फोटोंपासून ते आतापर्यंत एकत्र एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यानंतर आता शशांकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या खास दिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका खास कारणामुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Video : सूरज चव्हाणला भेटताच ‘ती’ मुलगी ढसाढसा रडू लागली अन्…; अजूनही झापुक झुपूकचं क्रेझ, व्हिडीओ व्हायरल
शशांकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, एक केक पाहायला मिळत असून त्यावर ‘प्रिशा’ असे लिहिले आहे. या व्हिडीओमध्ये त्याचा मुलाचा आवाज ऐकू येत आहे. “हे आई-बाबा आहेत. त्यांची अॅनिव्हर्सरी आहे, म्हणून हा चॉकलेट केक त्यांच्यासाठी आणला आहे”, असं शशांकचा लेक म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना शशांकने लिहिले आहे की, “आमची अॅनिव्हर्सरी या पेक्षा गोड नोटवर संपूच शकत नाही! आम्हा दोघांनाही भरभरुन शुभेच्छा आणि प्रेम देणाऱ्या सगळ्यांना मनापासून थँक्यू”.
शशांकच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शविली आहे. तर अनेकांनी कमेंट करत त्याच्या लेकाचं कौतुक केलं आहे. “किती गोड आवाजात आई बाबांना शुभेच्छा दिल्या”, “किती छान आवाजात ऋग्वेद आईबाबाच्या लग्नाच्या वाढदिवसाचा शब्द बोलतोय. ऐकताना किती गोड वाटतोय.शशांक प्रियांका तुमचा आता खरा लग्नाचा वाढदिवस साजरा झाला”, “शशांक/प्रियांका तुमच्यासारख्या गोड जोडीचे आम्ही चाहते आहोत याचा आम्हालाही अभिमान आहे. अगं आई गं, चॉकलेट केक पेक्षा गोड या छोट्या पेस्ट्री ऋग्वेदचा आवाज आहे”, असं म्हणत शशांकच्या लेकाचं कौतुक केलं आहे.