Pushpa 2 Premiere : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाचा बुधवारी हैदराबादमध्ये प्रीमियर झाला, यावेळी तिथे बरीच चेंगराचेंगरी झाली. संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्क्रिनिंगदरम्यान अभिनेत्याला पाहण्यासाठी गर्दी जमल्याने हा गोंधळ उडाला. अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’ आज ५ डिसेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. एक दिवसआधी, बुधवारी रात्री, आरटीसी चौकात असलेल्या संध्या थिएटरमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर शो झाला, ज्यामध्ये एका ३९ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. तर एका मुलाची प्रकृती गंभीर झाली आहे. तो त्या महिलेचा धाकटा मुलगा असल्याचे बोललं जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलसुखनगरमधील रेवती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेने पती भास्कर आणि दोन मुलांसह चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावली होती. रात्री १०.३० च्या सुमारास गोंधळ उडाला, जेव्हा स्क्रिनिंगला उपस्थित असलेला चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये पोलिस आणि आसपासचे लोक पीडितेच्या मदतीसाठी धावताना दिसत आहेत. रेवतीला रुग्णालयात नेण्यापूर्वी तिला सीपीआर देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मुलाची प्रकृती चिंताजनक आहे, तर रेवतीचा जागीच मृत्यू झाला.
आणखी वाचा – Tharla Tar Mag : प्रतिमेला जीवे मारण्याचा प्रियाचा प्लॅन फसला, सायली-अर्जुनच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरु
VIDEO | Telangana: A large crowd gathers at Sandhya Theatre in Hyderabad as Allu Arjun (@alluarjun) arrives for the premiere of his movie 'Pushpa 2'.
— Press Trust of India (@PTI_News) December 4, 2024
'Pushpa 2', set to hit the screens Tomorrow, is directed by Sukumar and also features returning stars Mandanna and Fahadh Faasil.… pic.twitter.com/uDTAcM5o5E
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुनच्या आगमनाची बातमी पसरताच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. अभिनेत्याच्या जवळ जाण्यासाठी अनेकांची धावपळ सुरु झाली. अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी त्याला पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेरले होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पोलिस जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करतानाही दिसत आहेत. आयएएनएसच्या वृत्तानुसार, थिएटरच्या बाहेरील गोंधळात थिएटरचे मुख्य गेटही कोसळले.
अल्लू अर्जुनही चित्रपटगृहात असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा तैनात करुन सुरक्षा वाढवली. अल्लू अर्जुन त्याच्या कारच्या सनरुफमधून बाहेर येतो आणि गर्दीला हात दाखवतो. या बिग बजेट चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा हा सिक्वेल आहे. हा चित्रपट १० हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. पोस्ट-प्रॉडक्शन विलंबामुळे 3D आवृत्तीचे प्रकाशन शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आले. यात अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदान्ना, फहद फासिलसह अनेक कलाकार आहेत.