दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा २’ हा चित्रपट या वर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या एक दिवस आधी केलेल्या प्रीमियर शोच्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांनी अटक केली होती.नंतर त्याला लगेचच अटकपूर्व जामीनदेखील मंजूर झाला होता. अशातच आता अल्लू अर्जुनबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. अशातच आता त्याच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली होती. दरम्यान आता या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. (allu arjun family leave home)
हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील अल्लू अर्जुनच्या घरावर रविवारी आंदोलकांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या घराबाहेर ठेवलेली भांडी फोडली, रागाच्या भरात संपूर्ण लॉन फाडले आणि टोमॅटो फेकण्यात आले. अन्य ठिकाणी अभिनेत्याचा पुतळाही जाळण्यात आला. आंदोलक पीडितेच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये देण्याची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणी आता पोलिसांनी एकूण आठ आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली होती.
Allu Arjun’s kids (Arha & Ayaan) whisked away from the house after attacks today! pic.twitter.com/iu5N5UFZ3Q
— idlebrain.com (@idlebraindotcom) December 22, 2024
दरम्यान आता अल्लूचया घरातील एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मुलगी अल्लू आराहा व मुलगा अल्लू आयान हे कुटुंबासहित घराच्या बाहेर पडून कारमध्ये बसताना दिसत आहेत. दरम्यान या व्हिडीओमध्ये कारला सगळ्यांनी घेरलेलं दिसत असून मुलगीदेखील घाबरलेली दिसत आहे. अल्लू अर्जुनने मुलांना आजोबांच्या घरी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान या सगळ्या प्रकारावर अल्लू अर्जुनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण त्याचे वडील अल्लू अरविंद यांनी झालेल्या प्रकाराचा निषेध दर्शवला. ते म्हणाले की, “आमच्या घरी जे काही झालं ते सगळ्यांनी बघितलं. पण आता काय करावं याबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्यासाठी आता यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं शक्य नाही. या प्रकरणी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले आहे”. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आता सहा लोकांना अटक करण्यात आले आहे. तसेच हैद्राबाद पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करण्यासदेखील सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी अल्लू अर्जुन काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागले आहे.