मनोरंजन क्षेत्रातील अनेकांच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. बॉलिवूडमधील अनेक जोड्या आई-बाबा झाले आहेत. अशातच आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मुदस्सरच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. २३ डिसेंबर २०२४ रोजी मुदस्सरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती शेअर केली आहे. लग्नाच्या एका वर्षानंतर ही गोड बातमी मुदस्सरने चाहत्यांना दिली आहे. गेल्या वर्षी ३ डिसेंबर २०२३ रोजी मुदस्सर व रिया किशनचंदानीबरोबर लग्नबंधनात अडकला होता. त्याने आता मुलगी झाल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत मुदस्सरने काय सांगितलं? हे आपण आता जाणून घेऊया. (mudassar khan blessed with baby girl)
मुदस्सरने मुलीच्या जन्माची बातमीदेताना सांगितले की, “अल्लाहचे आशिर्वाद व कुटुंबं, मित्रपरिवाराच्या प्रार्थनांमुळे आम्ही मिस्टर व मिसेस खान यांना घोषणा करताना आनंद होत आहे की आमच्याकडे मुलगी जन्माला आली आहे. अलहमदुलिल्लाह. तुमच्या प्रेम व आशीर्वादासाठी धन्यवाद”. तसेच पोस्ट शेअर करत त्यामध्ये होली हॉस्पिटलमधील डॉ. अंजूम व टीमचे आभार मानले आहेत. मुदस्सरने केलेल्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
गेल्या वर्षी ३ डिसेंबर २०२३ रोजी मुदस्सरने रिया किशनचंदानीबरोबर लग्न केले. त्याने फोटो पोस्ट करत त्याच्या लग्नाची माहिती दिली. या जोडीने पारंपरिक पांढरा आऊटफिट परिधान केला आहे. मुदस्सरने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली असून रियानेदेखील सेम रंगाचा घागरा परिधान केलेला दिसून आला. लग्नातील त्यांचे गोड फोटो सोशल मीडियावर शेअर करत मुदस्सरने लिहिले की, “अलहमदुलिल्लाग, जगातील सर्वात सुंदर रिया किशनचंदानीबरोबर लग्न झाले आहे. माझ्या सर्व मित्रांना व माझ्या माणसांनी पाठिंबा दिल्याबद्दल खूप धन्यवाद”.
दरम्यान मुदस्सरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो बॉलिवूडमधील अनेक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तसेच ‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमामध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसून आला होता. त्याच्या नृत्याचे अनेक चाहतेदेखील आहेत. सध्या तो वडील झाल्यामुळे खूप खुश असलेला दिसून येत आहे.