बॉलिवूड गायक व संगीत दिग्दर्शक सचेत टंडन सध्या खूप चर्चेत आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सचेत व त्याची पत्नी परंपरा ठाकूर हे आई-बाबा होणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यांच्याबद्दलची एक नवीन माहिती समोर आली आहे.सचेत व परंपरा यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. याबद्दलची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सचेतने सोशल मीडियावर पोस्टमध्ये सचेतने काय लिहिले आहे ते आपण आता जाणून घेऊया. (sachet tondon baby boy)
परंपरा व सचेत हे दोघंही सोशल मीडियावर अधिक सक्रिय असलेले बघायला मिळतात. त्यांचे गाण्यांचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर बघायला मिळतात. दोघांच्याही व्हिडीओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते. अशातच आता घरी चिमुकला आल्याची माहिती त्याने शेअर केली आहे. पोस्टमध्ये सचेतने लिहिले की, “महादेवाच्या आशीर्वादाने आम्हाला आमच्या लाडक्या बाळाच्या आगमनाबद्दलची घोषणा करताना खूप आनंद होत आहे”.
पुढे त्याने लिहिले की, “आम्ही या आमच्या चांगल्या काळासाठी तुमच्या आशीर्वाद व शुभेच्छांची अपेक्षा करत आहोत. नम: पार्वती पतये, जय मातादी”. सचेत व परंपरा यांचे अनेक गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. त्यांच्या जादुई आवाजाला चाहत्यांची खूप पसंती मिळते. त्यांचे अनेक म्युजिक अल्बमदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मात्र शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ या चित्रपटातील गाण्यांमुळे अधिक प्रसिद्धी मिळाली.
तसेच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर सचेत व परंपरा यांची भेट २०१५ साली एका रिअलिटी शो दरम्यान झाली होती. यामध्ये दोघही स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. याचवेळी त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर २०२० साली दोघंही लग्नबंधनात अडकले. दरम्यान याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांचे ‘प्यार बन गए’ हे गाणं भेटीस आले होते. या गाण्याला चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती.