बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा सध्या खूप चर्चेत आहे. आजवर गोविंदाचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटांमध्ये साकारलेल्या त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. गेले ३५ वर्ष गोविंदा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. या कार्यकाळात ‘आंखे’, ‘साजन चले सासुराल’, ‘कुली नं १’, ‘एक और एक ग्यारह’, ‘भागमभाग’ व ‘पार्टनर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये साकारलेल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. गोविंदाचा मुलगा यशवर्धनदेखील आता वाडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार २०२५ मध्ये यशवर्धन चित्रपटांमध्ये काम करताना दिसू शकतो. (govinda son in movies)
मिळालेल्या माहितीनुसार, यशवर्धन अभिनयाची सुरुवात हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक साई राजेशच्या येणाऱ्या एका चित्रपटातून करणार आहे. या चित्रपटात एक छान अशी प्रेमकहाणी असेल. यामध्ये गोविंदाचा मुलगा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी यशवर्धनने ऑडिशनही दिली होती. ही भूमिका त्याला त्याच्या मेहनतीने मिळाली आहे. दिग्दर्शक साई राजेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी आता मुख्य भूमिकेसाठी एका अभिनेत्रीचा शोध सुरु आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांना एक नवीन जोडी सादर करायची आहे. यासाठी आतापर्यंत १४,००० पेक्षा अधिक ऑडिशनच्या कलिप्स समोर आल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच चित्रपटाची नायिका ठरणार आहे. तसेच २०२५ पासून या चित्रपटांचे काम सुरु करण्यात येईल.
तसेच या चित्रपटासाठी साई राजेश व निर्माते या लव्ह स्टोरीसाठी एक खास गाणंदेखील आणणार आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांचे लक्ष याकडे लागणार आहे. त्यामुळे गोविंदाचा मुलगा एका नव्या आणि रोमॅंटिक अंदाज बघायला मिळणार आहे.तसेच सध्या गोविंदा चित्रपटांपासून दूर असलेला दिसून येतो. मात्र त्याने 80 व 90 च्या दशकामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. विविध भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याचवेळी त्याने सुनीताबरोबर लग्नगाठही बांधली. परंतु याबद्दल त्याने कोणालाही कळू दिले नव्हते.