दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा २’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. दोन दिवसांतच या चित्रपटाने सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. ‘पुष्पा :द राईज’, ‘पुष्पा २: द रुल’ नंतर आता ‘पुष्पा ३: द रॅम्पेज’ हा तिसरा भाग भेटीला येणार आहे. जर तुम्ही या चित्रपटाचा दूसरा भाग पाहिला असेल तर तिसऱ्या भागात काय होणार याकडे सगळ्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. पहिल्या भागांमध्ये पुष्पाच्या जन्मापासून ते तारुण्यात येईपर्यंत तसेच चंदन तस्करी व्यवसायात कसा येतो? याबद्दल दाखवण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या भागांमध्ये पुष्पाचे वाढलेले प्रस्थ बघायला मिळत आहे. त्यामुळे तिसऱ्या भागात दिग्दर्शक यापेक्षा वेगळं काय देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (pushpa 3 announcement)
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदना व फहाद फाजील यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ५ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. हिंदी, तेलुगू, कन्नड व मल्याळी या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला खूप पसंतीदेखील मिळाली आहे. आता तिसऱ्या भागाची लोक आतुरतेने वाट बघत आहेत. त्यामुळे या भागाची कथा काय असू शकते? याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया.
दरम्यान ‘पुष्पा २’ मध्ये शेवटी एक मोठा धमाका झालेला बघायला मिळाला. यावेळी पुष्पा संपूर्ण कुटुंबं दिसून येत आहे. त्याचवेळी तिथे ठेवलेल्या पुष्पगुच्छामध्ये बॉम्ब ठेवलेला असतो त्याचा ब्लास्ट होतो. मात्र तिथे काय होतं? कोण वाचतं? कोण मरतं? याबद्दल काहीही माहिती समोर आली नाही. यामध्ये कदाचित श्रीवल्ली हे पात्र प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकतं. मात्र यामध्ये श्रीवल्ली गरोदर असल्याचे दाखवले होते. त्यामुळे तिचा जीव जाऊन तिचे बाळ पुढे जगू शकते.
तसेच फहाददेखील स्वतःला वाचवण्यासाठी एका गोडावूनमध्ये जाऊन आग लावतो. नंतर तो तिथेच थांबतो. मात्र नंतर बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर फहाद कुठेही दिसून येत आहे. मात्र त्याची भूमिका इतक्यात संपवणार नाहीत अशी शक्यता प्रेक्षकांना वाटत आहे. तसेच अभिनेता विजय देवरकोंडाने देखील २०२२ साली एक पोस्ट शेअर करत ‘पुष्पा ३’ या चित्रपटाची घोषणा केली होती. तसेच सुकुमारबरोबर काम करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचेही म्हंटले होते.