Suraj Chavan Video : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हा रिऍलिटी शो संपला असला तरी या सीझनमधील कलाकार नेहमीच चर्चेत असलेले पाहायला मिळतात. यंदाच्या या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सूरज चव्हाणने ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व संपले असले तरी या शोची आणि शोमधील स्पर्धकांची चर्चा अजूनही कमी होताना दिसत नाहीये. सूरज तर ‘बिग बॉस’नंतर अधिक चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. नेहमीच तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. इतकंच नव्हे तर सूरजचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्याचे चाहते त्यासाठी वेडे आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात बारामतीकर सूरज चव्हाणने हवा केली. झापून झुपक स्टाईलने सूरजने संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली.
आता ‘बिग बॉस’ नंतर सूरज पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम व युट्युब अकाउंटवरुन व्हिडीओ शेअर करायला सुरुवात केली आहे. सूरजबद्दल अजून एक बोलायचं म्हणजे लवकरच तो त्याच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणार आहे. आपलं स्वतःच हक्काचं घर असावं असं सूरज ‘बिग बॉस’च्या घरातही बोलताना दिसला. इतकंच नव्हे तर त्याची सह्स्पर्धक अंकिता वालावलकर हिने देखील घर बांधण्यास ती काहीतरी मदत करेल असं आश्वासन सूरजला दिलं. काही दिवसांपूर्वीच सूरजच्या घराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
सूरजच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन त्याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सूरज सिमेंटच्या गोण्या उचलताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सूरजचा साधेपणा पाहायला मिळतोय. शिवाय व्हिडीओ पाहून असं वाटतंय की सूरजच्या घराचं काम सुरु झालं आहे. त्यामुळे कदाचित तो त्यांना मदत करावा असावा. काही दिवसांपूर्वी सूरजने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेतात काम करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. इतकी प्रसिद्धी मिळवूनही सूरजचे जमिनीवर पाय आहेत.
सूरजचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत. “भाऊ घराचे काम सुरु केले का”, “जमिनीवर पाय असणारा माणूस”, “यश काय आहेत माहित नाही पण माणूस जमिनीवर आहे हे नक्की”, “कोणत्याही कामाची लाज नसावी भावा. खूप अभिनंदन तुझ्या घराचे काम चालु आहे. तू त्यांना मदत करत असशील, ग्रेट”, अशा कमेंट करत त्याच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे.