दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या खूप चर्चेत आहे. आजवर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती सीता मातेची भूमिका साकारणार आहे. तिचा पहिला लूक सोशल मीडियावर लिक झाला होता. आता त्यामुळे तिचे चाहते तिच्या चित्रपटाची खूप वाट बघत आहेत. मात्र आता ती तिच्या अभिनय किंवा चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. साई पल्लवीचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तिने भारतीय सेनेविषयी भाष्य केले आहे. ते नक्की काय आहे हे आपण आता जाणून घेऊया. (sai pallavi statement viral)
साई पल्लवीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तो जानेवारी २०२२ मधील आहे. यामध्ये ती म्हणत आहे की, “भारतीय सैन्यदल एक आतंकवादी लोकांचा समूह आहे असं पाकिस्तानातील लोक म्हणतात. पण आपल्यासाठी ते तसे नाहीत. मला हा हिंसाचार समजूनच येत नाही”. साई पल्लवीच्या या वक्तव्यामुळे तिचे चाहते खूप नाराज झाले असून यावर प्रतिक्रियादेखील देत आहेत.
She is one of the most radicalized individuals I have ever encountered.
— Divya Gandotra Tandon (@divya_gandotra) October 25, 2024
She has no understanding that the Indian Army exists to protect our nation, not to harm innocent people across the border.
Hey @Sai_Pallavi92, if you have the fukn Guts, answer this: can you name a single… pic.twitter.com/7OZFgX2rOj
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी साई पल्लवीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “भारताने कधी इतर देशांमध्ये आक्रमण केले आहे त्याला आतंकवाद म्हणता येईल का? भारताने नेहमी पाकिस्तान व चीनपासून आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी बलिदान द्यावे लागले नाही का? मग भारतीय सैनिकांना आतंकवादी का म्हंटलं जातं?”.
तसेच दुसऱ्या एकाने ट्विट करत लिहिले की, “ती त्या कट्टरपंथी लोकांमधील आहे ज्यांचा मी सामना केला आहे. आपले भारतीय सैनिक देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर आहेत. तेथील निर्दोष लोकांना ते कधीही नुकसान पोहोचवत नाहीत. साई पल्लवी तुझ्यात जर हिम्मत असेल तर उत्तर दे. ज्यावेळी भारतीय सेनेने पाकिस्तानवर जे हल्ले केले त्यामध्ये निर्दोष लोक मारले गेले असे तु एक तरी उदाहरण देऊ शकतेस का?”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “हे खूप वाईट आहे. कम्युनिस्ट साई पल्लवी ‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारत आहे. पाकिस्तानातील लोक भारतीय सेनेला आतंकवादी म्हणून बघतात असं ही म्हणत आहे. याआधीदेखील तिने गोरक्षकांची तुलना ओसामाबरोबर केली होती”. दरम्यान साई पल्लीवी रणबीर कपूरबरोबर ‘रामायण’मध्ये दिसणार आहे. यामध्ये यश रावणाची भूमिका करताना दिसणार आहे.