Ranbir Kapoor And Alia Bhatt : रणबीर कपूर व आलिया भट्ट हे बॉलिवूड कपल नेहमीच चर्चेत असतं. आलिया व रणबीर यांची जोडी लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. रणबीर व आलिया ही जोडी शुक्रवारी रात्री मुंबईत स्पॉट झालेली पाहायला मिळाली. दोघेही आलियाची आई सोनी राजदानच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचले होते. यावेळी बाहेर जाताना त्यांच्याबरोबर असे काही घडले की दोघेही नाराज झाले आणि रणबीरही चिडलेला दिसला. ते त्यांच्या कारकडे जात असताना फोटोग्राफर्सनी त्यांना घेरले आणि आलिया अस्वस्थ झाली. रणबीर आलियाला सांभाळून घेऊन जाऊ लागला आणि पापाराझींवरही ओरडला.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, रणबीर कपूर पापराजींवर चिडला. कॅमेरा चेहऱ्यावर येताच रणबीर ओरडताना ऐकू आला, ‘काय करतोयस… काय करतोयस?’. दोघांच्या चाहत्यांनी लगेच सोशल मीडियावर त्यांना आपला पाठिंबा दर्शवला आणि पापाराझींवर टीका केली. एका चाहत्याने सांगितले, “ते त्यांच्या खूप जवळ गेले. गोपनीयता व आदर विसरले आहेत. हे पापाराजी भयानक आहेत”. तर एकजण म्हणाला, “मला वाटतं आलिया नाराज होती आणि रणबीर तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होता”. लोकांनी सांगितले की आलियाचे वागणे वेगळे वाटत होते. एका चाहत्याने म्हटले, “रेस्टॉरंटमध्ये जाताना ती उदास दिसत होती. ती सहसा पापराजींकडे बघून हसते पण आज तिने डोळे खाली ठेवले आणि ती काहीच बोलली नाही”.
आणखी वाचा – माधुरी दीक्षितसह स्टेजवर परफॉर्म करताना विद्या बालन खाली पडली अन्…; पुढे काय झाले ते पाहून व्हाल थक्क
आलियाला तिच्या लूकबद्दल ऑनलाइन ट्रोलिंगला सामोरे जावे लागल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे, एका व्हायरल व्हिडीओने खोटा दावा केला की, तिने कॉस्मेटिक सर्जरी केली होती जी चुकीची झाली. इतकंच नाही तर काहींनी अगदी तिच्या चेहऱ्याचा एका भागाला अर्धांगवायू झाला असल्याचं म्हटलं. या अफवांना प्रत्युत्तर देत आलियाने इन्स्टावर पोस्ट देखील केली.
आणखी वाचा – Video : “तर आईच्या पुढ्यात डोकं ठेवा…”, संकर्षण कऱ्हाडेने आईबाबत सादर केली कविता, उपस्थितही रडू लागले अन्…
या पोस्टमध्ये आलिया म्हणाली, “जे लोक कॉस्मेटिक करेक्शन्स किंवा सर्जरी करतात, त्यांच्याबद्दल मी कोणतंच मत बनवत नाहीये. तुमचं शरीर, तुमचा निर्णय. पण सोशल मीडियावर जे सर्रास व्हिडीओ व्हायरल करुन माझ्याबद्दल खोटे दावे केले जात आहेत की माझं बोटॉक्स चुकीचं झालंय, माझं हसणं थोडं वाकडं आहे, मी विचित्रपणे बोलते. हे सर्व हसण्याच्याही पलीकडचं आहे. मानवी चेहऱ्याबद्दल तुम्ही ही जी मतं बनवत आहात की अत्यंत टोकाची आहेत आणि आता तुम्ही अत्यंत आत्मविश्वासाने वैज्ञानिक स्पष्टीकरणं देत आहात की माझ्या चेहऱ्याच्या एका बाजूला पक्षाघात झाला आहे? ही मस्करी आहे का? शून्य पुरावे, कोणत्याही पुष्टीशिवाय आणि कोणत्याही आधाराशिवाय हे गंभीर दावे केले जात आहेत”.