दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा २’ सध्या खूप चर्चेत आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत दिसून आलेला अल्लू अर्जुन मात्र सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ‘पुष्पा २’ प्रदर्शनापूर्वी हैद्राबाद येथे प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी चेंगराचेंगरी झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल होत होत्या. दरम्यान या प्रकरणी नुकसान भरपाई म्हणून मृत महिलेच्या कुटुंबियांसाठी अल्लू अर्जुनने २५ लाखांची मदत जाहीर केली होती. तसेच मुलाच्या उपचाराचा संपूर्ण खर्चदेखील स्वतः करणार असल्याचे अभिनेत्याने सांगत माफी मागितली होती. अशातच आता अल्लू अर्जुनला अटक केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. (netizens reacted on allu arjun arresting)
याच प्रकरणी अल्लू अर्जुनला ताब्यात घेतलं असल्याचं पाहायला मिळत आहे. CNN व News18 नुसार, अल्लू अर्जुनविरुद्ध हैदराबाद चेंगराचेंगरी प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याशिवाय, संध्या थिएटरवर फौजदारी निष्काळजीपणासाठी कलम 105 आणि 118(1) BNS सह गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आले असून चौकशीसाठी पोलिस स्थानकात नेण्यात आले आहे. दरम्यान त्याला पोलिसांबरोबर जात असताना तो आधी कॉफी पिताना दिसला होता. तसेच अर्जुन बायकोच्या गालाला किस करतानाचा फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Heartbreaking Visuals💔 #AlluArjun pic.twitter.com/bC4lkPb7AN
— Let's X OTT GLOBAL (@LetsXOtt) December 13, 2024
अर्जुनच्या अटकेची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका चाहत्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “याचा अर्थ काय आहे? तो तर तिथे उपस्थितही नव्हता”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “क्रिकेटदरम्यान अशी चेंगराचेंगरी झाली तर तुम्ही विराट कोहलीला अटक करणार आहात का?”.
आणखी वाचा -“माझ्यासाठी हे यश नाही…”, गुगलवर सर्वाधिक सर्च होत असल्यामुळे हिना खान नाराज, म्हणाली, “मी प्रार्थना करते की…”
तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “काय वेडेपणा आहे हा? गर्दीसाठी अभिनेता काय करेल? ही चित्रपटगृहाच्या मालकाची जबाबदारी आहे. अल्लू अर्जुन तर चित्रपटगृहाचा मालकही नाही”. दरम्यान आता या सगळ्या प्रकरणाला कोणते वळण लागणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटावर नक्की काय परिणाम होणार? याकडेदेखील संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे तसेच अल्लू अर्जुनच्या करियरवर काय परिणाम होणार? हेदेखील पाहाण्यासारखे आहे.