दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या अटकेने संपूर्ण मनोरंजन क्षेत्राला धक्का बसला आहे. ‘पुष्पा २’ प्रीमियरवेळी हैद्राबाद येथील संध्या चित्रपटगृहामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच मृत महिलेची दोन्ही मुलं जखमी झाली होती. या प्रकरणी आता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली असून त्याच्या अटकेवर अनेक प्रश्नदेखील उपस्थित होत आहेत. अल्लू अर्जुनच्या अटकेचे अनेक व्हिडीओ व फोटोदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये अल्लू अर्जुनला पोलिस लिफ्टमधून घेऊन जाताना दिसत आहेत. तसेच त्याआधीचे त्याचे कॉफी पितानाचे फोटो व व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत. (allu arjun memes viral)
हैद्राबाद येथील चित्रपटगृहात घडलेल्या प्रकारानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली होती. अल्लू अर्जुननेदेखील या प्रकरणी नुकसान भरपाई म्हणून मृत महिलेच्या कुटुंबियांसाठी अल्लू अर्जुनने २५ लाखांची मदत जाहीर केली होती. तसेच मुलाच्या उपचाराचा संपूर्ण खर्चदेखील स्वतः करणार असल्याचे अभिनेत्याने सांगत माफी मागितली होती. आता अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर नेटकऱ्यांनी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर अनेक मिम्सदेखील व्हायरल झाले आहेत.
अल्लू अर्जुन #AlluArjunArrest pic.twitter.com/jYhFV5XT5N
— Raja Babu (@GaurangBhardwa1) December 13, 2024
व्हायरल झालेल्या एका मीममध्ये लिहिले आहे की, “कितीही गुंडगिरी करा शेवटी भारतीय पोलिसच जिंकणार”, दुसऱ्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तो चित्रपटगृहामध्ये एका पब्लिसिटि स्टंटसाठी गेला. त्याच्या या निर्णयामुळे एका निरागस व्यक्तीला जीव गमवावा लागला. कठोर कारवाई होणं गरजेचे आहे, चाहत्यांनी इतकही हुरळून जाऊ नये. कायद्यापुढे कोणीही नाही”.
lee bhai pushpa bhau too gyaa.🙆🏻#AlluArjunArrest pic.twitter.com/0KC8ZXLXMY
— Ayush Pandit 🇮🇳 (@ayush95_) December 13, 2024
तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “बायकोला किस करुन हा पोलिसस्थानकात जात आहे, मी काहीतरी नवीन तयार करतोय, वाह वाह”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “घ्या, पुष्पा भाऊ तर गेला”. अल्लू अर्जुन प्रकरणी या सर्व पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. अल्लू अर्जुनच्या या केसचा नक्की निकाल काय लागणार? याकडेच आता सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.