Hina Khan : हिना खान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हिनाने आजवर अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नेहमी हसतमुख राहणारी हिना सध्या कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी लढा देत आहे. यावर्षी अभिनेत्रीला स्टेज थ्री कॅन्सर झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून ती या आजाराशी धैर्याने लढत आहेत आणि इतरांसाठीही तिचा हा लढा प्रेरणास्थान बनला आहे. गेल्या २४ वर्षांपासून गुगलवर सर्च केलेल्या २० सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत या सर्व हिना खानचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, हीना यावर खुश नसून तिने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून हिना खानला खूप प्रसिद्धी मिळाली. गुगलवर सर्वाधिक सर्च होणारी अभिनेत्री बनल्याबद्दल हिना खानने सोशल मीडियावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या बातमीचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे, परंतु तिने सांगितले की तिला याबद्दल अभिमान किंवा आनंद वाटत नाही. या पोस्टद्वारे भावनिक संदेश देत ती म्हणाली, “मी अनेक लोकांना या नवीन घडामोडीबद्दल माझे अभिनंदन करताना पाहिले आहे, परंतु प्रामाणिकपणे, माझ्यासाठी हे यश नाही किंवा अभिमान वाटण्यासारखे काही नाही”.
आणखी वाचा – गुरांना सांभाळतात, स्वतःच जेवण करतात अन्…; गावी असं आयुष्य जगतात नाना पाटेकर, तिथेच राहतात कारण…

हिनाने पुढे लिहिले की, “कोणालाही त्यांच्या निदनामुळे किंवा आरोग्याशी संबंधित अडचणींमुळे गुगलवर शोधले जाऊ नये अशी मी प्रार्थना करते”. हिना पुढे लिहिते की, “या कठीण काळात माझ्या प्रवासाबद्दल लोकांच्या खऱ्या आदराचे मी नेहमीच कौतुक केले आहे”. यावेळी हिनाने यावर जोर दिला की, ती तिच्या कामासाठी आणि कर्तृत्वासाठी ओळखली जाईल. अभिनेत्रीने निष्कर्ष काढला की, “माझ्या निदनाच्या आधी मी जशी होते तशी मला एक अभिनेत्री म्हणून Googled किंवा माझ्या कामासाठी वा कर्तृत्वासाठी ओळखले जाऊ इच्छित आहे”.
आणखी वाचा – Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला अटक, ‘पुष्पा २’मुळे प्रकरण अंगलट, पण असं नक्की काय घडलं?
हिना खानला जून २०२४ मध्ये स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते आणि ती ही लढाई धैर्याने लढत आहे. ती तिच्या खडतर प्रवासाचे डॉक्युमेंटेशनही करत आहे आणि केमोथेरपीदरम्यान केस गळण्याबद्दलही ती उघडपणे बोलत आहे. ‘बिग बॉस ११’ मधील स्पर्धक असलेल्या हिनाने तिचे केस गळण्यापूर्वी तिचे मुंडन केले होते आणि त्यातून एक विग बनवला होता, जो ती आत्मविश्वासाने घालते.