टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस 18’ सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. मागच्या आठवड्यात ६ ऑक्टोबर रोजी हा शो सुरू झाला. या पर्वात १९ स्पर्धक सहभागी झाले, ज्यामध्ये टीव्ही कलाकार, बॉलीवूड सेलिब्रिटी, राजकारणी आणि वकील यांचा समावेश आहे. ‘बिग बॉस’ या शोचे नावीन्य म्हणजे या शोनध्ये रोज येणारे नवनवीन ट्विस्ट्स. या घरात रोज नवनवीन येणारे ट्विस्ट्स येतच असतात आणि यामुळे या शोला बघण्याची उत्सुकता कायम असते. अशातच आता या शोमध्ये आणखी एक नवीन ट्विस्ट येणार आहे आणि हा ट्विस्ट म्हणजे या शोमध्ये मिड वीक एलिमिनेशन होणार आहे. (Bigg Boss 18 in the mid week eviction)
‘बिग बॉस 18’ चा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना रेशन देण्याची अट घातल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी बिग बॉस गृहस्थांना २ पर्याय देतात की, जर तुम्हाला घरात रेशन मिळवायचे असेल आणि शोमध्ये चांगले खायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला घरातील २ सदस्यांना तुरुंगात पाठवावे लागेल किंवा नॉमिनेटेड सदस्यांपैकी एकाला तुम्हाला घरातून बाहेर काढावे लागेल”. त्यामुळे आता घरातून नक्की कोण बाहेर जाणार? याविषयी अनेक चर्चा होताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना हे आदेश देताच, घरातील सदस्य पहिला पर्याय निवडतात आणि दोन सदस्यांना तुरुंगात टाकण्याचा मोठा निर्णय घेतात.
Tomorrow Promo #BiggBoss18: Avinash get EVICTED from house bcz of HMs votes.pic.twitter.com/OEQyxLRMMi
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) October 15, 2024
तेव्हाच अविनाश मिश्रा म्हणतो की, “अविनाशला तुरुंगात जायला हवे आहे”. अविनाशचे म्हणणे ऐकून आरफीन काहीतरी बोलू लागतो आणि अचानक दोघांमध्ये जोरदार भांडण होते. अविनाश घरातील सर्व सदस्यांना सांगतो की एकट्याने बोलण्याची ताकद कोणाचीच नाही, मी बोलले की सगळे बाहेर येतात. त्याचवेळी स्पर्धक चुम दरांग अविनाशला शांत राहण्यास सांगते. पण अविनाश तिचंही ऐकत नाही. जेव्हा ती आरफीनला समजावून सांगू लागते तेव्हा अविनाश चुम दरांगला ओरडायला लागतो आणि मग चुम दरांगदेखील तिचा संयम गमावते आणि अविनाशला ओरडू लागते.
आणखी वाचा – लोकप्रिय ‘सीआयडी’ मालिका आता मराठीमध्ये येणार, नवीन प्रोमो समोर, उत्सुकता शिगेला
चुम दरांग आणि अविनाशच्या कडाक्याच्या भांडणानंतर, प्रत्येकजण अविनाशला घरातून बाहेर काढण्यासाठी निवडतो. दरम्यान, ‘बिग बॉस’ने अविनाशला घरातून काढून टाकले आणि त्याला बाहेर जाण्यास सांगितले. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे आता नक्की या घरातून कोण बाहेर जाणार हे आगामी भागांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.