Nick Jonas Viral Video : जगभरात चर्चेत असलेल्या आणि लोकप्रिय असलेल्या प्रियांका चोप्राचा पती निक जोनास यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्रीबरोबरच्या लग्नानंतर त्याच्या सोशल मीडिया फॅन फॉलोइंगमध्ये आणखी वाढ झाली आहे. निक जोनासची गाणी जगभरात प्रसिद्ध आहेत. सध्या निक जोनास म्युझिकल वर्ल्ड टूर कॉन्सर्टवर आहे. तो, त्याचा भाऊ केविन याच्याबरोबर वेगवेगळ्या शहरात जाऊन आणि या दौऱ्यात त्यांची गाणी गाऊन लोकांचे मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याची पॅरिसमध्ये कॉन्सर्ट झाली होती, त्यानंतर आता प्रागमध्ये त्याची कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. पण इथे तो परफॉर्मन्सच्या मध्येच स्टेजवरुन पळून गेला.
निकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याला पाहून चाहत्यांनी त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. वास्तविक, निक जोनास प्रागमध्ये केविन व जोबरोबर एका लाइव्ह शोमध्ये परफॉर्म करत होता. यादरम्यान कोणीतरी त्याला लेझरने लक्ष्य केले. हे पाहून निक घाबरला आणि स्टेजवरुन पळू लागला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गर्दीतून कोणीतरी निकला लेझर लाईट दाखवली आहे.
यावेळी निकला कधी डोके तर कधी चेहऱ्याला लक्ष्य केले जात आहे. हे सर्व पाहून निक घाबरला. तो शो मध्येच सोडून स्टेजवरुन पळू लागला. यादरम्यान त्याने हाताने शो थांबवण्याचे संकेतही दिले. तर, त्याच्याबरोबर परफॉर्मन्ससाठी आलेले जो व केविन स्टेजवर उभेच राहिले. दुसरीकडे, नंतर सुरक्षा पथकाने त्या व्यक्तीला बाहेर काढले ज्याने निकवर लेझर लाईट दाखवली होती.
आणखी वाचा – ऐश्वर्या नारकर यांना मिळाला ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, खास फोटो केला शेअर, म्हणाल्या, “कृतज्ञ…”
निक जोनासने तत्काळ कारवाई करत स्वतःला वाचवले. पण चाहत्यांनी गायकाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अनेक कमेंट करताना दिसत आहेत. “तुम्हाला निककडे लेसर का दाखवायची आहे?”, “मला जे समजले त्यावरुन, यामुळे शो काही मिनिटांसाठी थांबवला गेला, म्हणून त्यांनी वेळ संपण्याचे संकेत दिले”. “लोकांना अजिबात शिष्टाचार नाही का?”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी निकला पाठिंबा दिला आहे.