गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नेमकं काय रिकामं आहे?”, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा नरेंद्र मोदींना प्रश्न, म्हणाले, “२०१४ पासून…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 20, 2023 | 12:02 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prakash raj tweet viral on narendra modi

Prakash raj tweet viral on narendra modi

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व देशात आपल्या कामामधून ओळखले जातात. राजकारणात त्यांच्या नावाचा चांगलाच दबदबा आहे. नुकताच त्यांच्या उपस्थितीत जुन्या संसदेतून नव्या संसदेत प्रवेश करण्याचा सोहळा पार पडला. तसंच महिला आरक्षणाचं विधेयकही त्यांनी नुकतंच संसदेत सादर केलं. पण या महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोदींवर बरीच टीका होताना दिसते आहे. मनोरंजन क्षेत्रातील एका कलाकारांनेही त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी नरेंद्र मोदींचा फोटो ट्विट करत त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. ( Prakash raj tweet viral on narendra modi)

अभिनेता प्रकाश राज हे दाक्षिणात्य अभिनेता असले तरी त्यांनी आज बॉलिवूडमध्ये देखील आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. ‘सिंघम’ चित्रपटात त्यांनी साकारलेली जयकांत शिकरे ही भूमिका तर ‘वाँटेड’ चित्रपटामधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. त्यांनी आजपर्यंत कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केलं आहे. प्रकाश सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. नुकतीच त्यांनी राजकिय मुद्द्यावर केलेली ट्विट बरीच चर्चेत आहे. ही ट्वीट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.

Daily Quiz since 2014:-

Tell me whats EMPTY.. the folder he is carrying.. the pocket he fingering.. or the Brain .. #justasking pic.twitter.com/nQ2mzur0I2

— Prakash Raj (@prakashraaj) September 19, 2023

आणखी वाचा – शाहरुख खानच्या घरी झाले गणरायाचे आगमन, फोटो शेअर करत दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, म्हणाला, “गणपती बाप्पा…”

त्यांनी नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो शेअर केला. ज्यात मोदी यांच्या हातात एक रिकामी फोल्डर आहे तर दुसरा हात त्यांच्या खिशात आहे. हा फोटो शेअर करत ते लिहीतात, ‘२०१४पासून रोज पडलेलं कोडं, मला सांगा नेमकं काय रिकामं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात असलेला फोल्डर त्यांच्या जॅकेटचा खिसा की त्यांचं डोकं’, अशा आशयाचं ट्विट करत प्रकाश यांनी पंतप्रधानांची खिल्ली उडवली. त्यांनी आजवर केलेल्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

आणखी वाचा – ‘पिंकीचा विजय असो’ फेम ‘या’ अभिनेत्रीने उरकला साखरपुडा सोहळा, साखरपुड्याचे रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली, “आयुष्यभरासाठी…”

प्रकाश यांनी केलेल्या या ट्विटची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. त्यांच्या या ट्विटवर बऱ्याच प्रतिक्रिया येताना दिसत आहे. याअगोदरही प्रकाश यांनी अशी वादग्रस्त ट्वीट केली होती. त्यांनी ‘चांद्रयान ३’ च्या संदर्भातही असे खिल्ली उडवणारे विधान केले होते. त्यावेळीदेखील त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.

Tags: bollywood newsprakash rajsocial mediasouth actortweet viral
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
Milind Gawali On Ganeshotsav

'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवर गणरायासाठी बनवला नयनरम्य देखावा, मिलिंद गवळींनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं, "माझं भाग्य की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.