‘आई कुठे काय करते’ ही प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेपैकी एक मालिका आहे. गेली चार वर्ष ही मालिका पेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवरही गणरायाचं आगमन झालं आहे. अभिनेते मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत मालिकेच्या सेटवरील गणेशोत्सवाचं उत्तम शब्दात वर्णन केलं आहे. सेटवर बाप्पासाठी बनविण्यात आलेला देखावा साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Milind Gawali On Ganeshotsav)
मिलिंद गवळी यांनी सेटवर विराजमान झालेल्या गणरायाचा एक व्हिडीओ शेअर केला असून त्याखाली कॅप्शन देत म्हटलं आहे की, “गणपती बाप्पा मोरया”. आमच्या “आई कुठे काय करते” या स्टार प्रवाह वरच्या मालिकेच्या सेटवरचा गणपती बाप्पाचं आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आगमन झालं आहे. आमच्या मालिकेचे सर्वेसर्वा राजन जी शाही , यांच्या हस्ते पूजा करून गणपती बाप्पाची स्थापना केली, आमच्या मालिकेच्या बरेच कलाकार आणि तंत्रज्ञांच्या घरी गणपती बाप्पाचा आगमन होतं असंत, त्यामुळे आम्हाला जरा अधिक सुट्ट्या हव्या होत्या, पण त्यामुळे सगळ्यांना जरा एक्स्ट्रा तास कामही करावं लागलं, पण आमच्या आर्ट डिपार्टमेंटनी त्याहून एक्स्ट्रा काम केलं आणि हा सुंदरसा गणपतीचा देखावा तयार केला.”
“चांद्रयान ३चं बॅकड्रॉप फारच गोड तयार केलं आहे. हा आमचा ‘डी के पी’ कंपनीचा गणपती बाप्पा, जो आम्ही ठाण्यामध्ये बसवतो, त्याच्या व्यतिरिक्त ‘डी के पी’चे अजून तीन गणपती बाप्पा प्रत्येकांच्या मालिकेच्या सेटवर बसतात. “अनुपमाच्या” सेटवर ” ये रिश्ता क्या कहलाता है “च्या सेटवर आणि BKAS च्या सेटवर गणपती बाप्पा विराजमान होतात.’ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत तर गेली पंधरा वर्षे गणपती बाप्पाचं आगमन होत आहे, आणि ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच आता चौथं वर्ष आहे, आणि माझं भाग्य की चारही वर्ष मला गणेश चतुर्थीच्या गणपती बाप्पाच्या पूजेचा लाभ मिळाला.”
“आमचे दाजी खूप श्रद्धेने आणि प्रेमाने पूजाअर्चा ,होम हवन करत असतात. आणि त्यामुळे एक वेगळंच चैतन्य आमच्या सेटवर निर्माण होतं, कुठल्याही यशाच्या मागे एक दिव्यशक्ती असते याची प्रचिती नेहमी होते, तुम्हा सर्वांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवो हीच बाप्पाकडे सदिच्छा. “वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा”.