दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य त्याच्या कामानिमित्त चर्चेत असतोच पण त्याचबरोबर त्याचं वैयक्तिक आयुष्यसुद्धा कायम चर्चेत असतं. नागा चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाच्या बातम्या पसरल्या तेव्हा सर्वत्र खळबळ उडाली होती. ऑगस्ट महिन्यात नागा चैतन्य आणि बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं. कारण, कमी लोकांच्या आणि केवळ घरच्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा सोहळा पार पाडला होता. अशातच आता तो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे आणि अभिनेत्याच्या घरी आता लगीनघाईला सुरुवातही झाली आहे. (Naga Chaitanya and Shobhita Dhalipala Marriage)
नागा चैतन्य आणि शोभिता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेता आणि तत्पूर्वी त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींची सुरुवात झाली आहे. गोधूमा राय पसुपू दंचतमने त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींची सुरुवात झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे डिसेंबर २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नपत्रिकेची झलक व्हायरल होत आहे. या पत्रिकेवरुन असे गृहीत धरले जाऊ शकते की लग्नाचा कार्यक्रम संस्कृती आणि परंपरेने परिपूर्ण असेल. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात दोघांच्या लग्नाची तारीख ०४ डिसेंबर २०२४ अशी छापण्यात आली होती, त्यासोबतच पती-पत्नीचे नावही लिहिले होते.
Wedding Invitation:#Nagachaitanya 💞 #SobhitaDhulipala Wedding on Dec 4th pic.twitter.com/KcPH2U38GK
— Today Box Office (@TodayBoxOffice) November 16, 2024
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा मालिकेच्या सेटवर अपघात, रुग्णालयात केलं भरती, आता कशी आहे परिस्थिती?
ही लग्न पत्रिका पेस्टल कलर पॅलेटमध्ये तयार करण्यात आली असून त्यात आधुनिकता आणि परंपरा यांचे मिश्रण पाहायला आहे. कार्डावर मंदिराची घंटा, पितळेचे दिवे, पार्श्वभूमीत एक मंदिर, हिरवळ आणि केळीची पाने असलेली पांढऱ्या गायीचे फोटोही आहेत. लग्नाची आमंत्रणपत्रिका इतकी सुंदर आहे की, ती पाहूनच समजू शकतं की त्यांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही साधं आणि शांततापूर्ण असेल.
आणखी वाचा – स्टार प्रवाहवर आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, ‘ही’ मालिका घेणार का प्रेक्षकांचा निरोप?
दरम्यान, दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व अभिनेता नागा चैतन्य ही मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी होती. २०१७ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर अवघ्या चार वर्षांनी २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २०१७ मध्ये त्यांनी लग्न केलं. चार वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नागा चैतन्य व अभिनेत्री शोभिता धुलिपाला लग्नबंधनात अडकणार आहेत.