गेल्या काही दिवसांत स्टार प्रवाह वाहिनीवर काही नवीन मालिकांची घोषणा करण्यात आली. गेल्या काही दिवसांत वाहिनीने ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या दोन नव्या मालिकांची घोषणा केली आहे. अशातच आता वाहिनीवर आणखी एक मालिका दाखल होणार आहे. या नव्या मालिकेची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘तू ही रे माझा मितवा’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.(Star Pravah New Serial)
‘स्टार प्रवाह’च्या गणपती महोत्सवाला या दोघांनी उपस्थिती लावली होती. तेव्हापासूनच या दोघांची एकत्र नवीन मालिका सुरू होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत, लवकरक ही दोघे या नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिकेच्या या नवीन प्रोमोमध्ये प्रोमोमध्ये एका भल्यामोठ्या फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या कंपनीत साध्याभोळ्या मुलीची एन्ट्री होत असल्याचं पाहायला मिळतं. तिचा कंपनीतील पहिलाच दिवस असून या पहिल्याच दिवशी तिला यायला उशीर झाला आहे. या धावपळीत ती जिन्यात पाय अडकून पडते आणि तिच्या हाताला दुखापत होते. मालिकेत शर्वरी याच ईश्वरी देसाईचं पात्र साकारणार आहे.
तर अभिनेता अभिजीत आमकर हा अर्णव ही भूमिका साकारत असून तो एका मोठ्या फॅशन कंपनीचा मालक दाखवला आहे. तो ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी बनवलेले सगळे ड्रेस नापसंत करत असतो. एवढ्यात ईश्वरी तिथे येतेआणि ती ऑफिसचा पहिलाच दिवस असून मुंबईत नवीन असल्यामुळे धावपळ झाली आणि त्यामुळे हाताला दुखापत झाल्याचंही त्याला सांगते. यावर तो तिच्या जवळ येतो आणि तिच्या हातावरची जखम कर्मचाऱ्यांना दाखवून मला अशा रंगाचा ब्लड रेड रंग ड्रेससाठी हवा असल्याचे सांगतो.
यावर ईश्वरी म्हणते, “माणूस आहे की राक्षस” आणि हे ऐकताच अर्णव पुन्हा मागे फिरत तिच्या जवळ जातो आणि तिला सांगतो, “मला आवडलंय हे नाव राक्षस”. त्यानंतर तो त्याच्या खिशातला टिश्यू पेपर तिला देतो. याच ईश्वरी आणि अर्णवची गोष्ट प्रेक्षकांना ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत पाहायला मिळणार आहे. यावर ईश्वरी म्हणते, “माणूस आहे की राक्षस” हे ऐकताच अर्णव पुन्हा मागे फिरून तिला सांगतो, “मला आवडलंय हे नाव राक्षस” याच ईश्वरी आणि अर्णवची गोष्ट प्रेक्षकांना ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, ‘तू ही रे माझा मितवा’ ही नवीन मालिका येत्या २३ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. यावेळी सध्या स्टार प्रवाहवर ‘अबोली’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. पण आता या नवीन मालिकेमुले ‘अबोली’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की काय? अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत. तसंच अनेकांनी या नवीन मालिकेसाठी उत्सुकताही व्यक्त केली आहे.