शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Pushpa 2 Trailer : “फायर नहीं, वाईल्ड फायर”, ॲक्शन, फाईट आणि बरंच काही…; ‘पुष्पा-२’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 18, 2024 | 9:32 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
South actor Allu Arjun and actress Rashmika Mandana most awaited movie Pushpa 2 trailer is out.

अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना स्टारर पुष्पा २ चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वच माध्यमामध्ये एका चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. अनेक चाहते मंडळी या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत आणि हा चित्रपट म्हणजे अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २ द रुल’. येत्या ५ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रविवारी १७ नोव्हेंबरला चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘पुष्पा 2 द रुल’चा ट्रेलर लाँच केला आहे. पाटणामध्ये ‘पुष्पा 2 द रुल’ चित्रपटाच्या भव्य ट्रेलर लाँच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Pushpa 2 Trailer)

अल्लू अर्जुनच्या पुष्पाच्या स्टाईलने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे आणि चित्रपटातील जबरदस्त ॲक्शन पाहून थक्क व्हायला होत आहे. ‘पुष्पा २’ मध्ये दमदार डायलॉगही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ट्रेलरच्या सुरवातीला, ‘कौन है ये आदमी, जरूर इसे कोई गेहरी चोट लगी है’ असं म्हटलं जातं. ‘पुष्पा ढाई अक्षर…नाम छोटा है लेकिन साउंड बहोत बडा है, पुष्पा मतलब ब्रँड’ असं म्हणत पुष्पा म्हणजे अल्लू अर्जुनची एन्ट्री होते.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

आणखी वाचा – 18 November Horoscope : सोमवारचा दिवस मिथुन व कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाचा, तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या…

पुष्पा २’ मध्ये अल्लू अर्जुनचा अनोखा आणि हटके अंदाज दाखवण्यात आला आहे. तर ट्रेलरच्या शेवटी ‘पुष्पा १’मधील “फ्लॉवर नहीं फायर है…” या गाजलेल्या डायलॉगला घेऊन पुष्पा २ मध्ये आणखी एक नवीन डायलॉग लक्ष वेधून घेत आहे, तो म्हणजे – पुष्पा फायर नाही तर ‘वाईल्ड फायर’ आहे”. एकूणच एकाहून अधिक जबरदस्त डायलॉग, फाईट सीन्सची झलक या ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

आणखी वाचा – “संपूर्ण महाराष्ट्राला या आईने खूप काही दिलं पण…”, मालिकेला निरोप देताना ‘आई कुठे…’ फेम अरुंधतीच्या डोळ्यांत पाणी, शेअर केला भावुक व्हिडीओ

पुष्पाच्या फाईटसह त्याचा आणि रश्मीका मंदनाचा रोमान्सही पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हा चित्रपट पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यासाठी सर्वांना ५ डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे. ‘पुष्पा २ द रुल’चा २. ४८ सेकंदाचा ट्रेलर खरच वाईल्ड फायर आहे.

Tags: pushpa 2 TrailerPushpa 2 Trailer Marathi NewsPushpa 2 Trailer News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : अनुष्काने जिंकली किर्लोस्कर कुटुंबाची मनं, घरात येताच पारूला साऱ्यांच्या नजरेतून पाडलं अन्…; मालिकेत रंजक वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.