सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महेश भट्ट विवाहित असूनही त्यांच्या प्रेमामध्ये वेड्या होत्या सोनी राजदान, पहिल्या पत्नीपासून दोन मुलीही होत्या अन्…

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 25, 2023 | 7:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Soni Razdan and Mahesh Bhatt Lovestory

महेश भट्ट विवाहित असूनही त्यांच्या प्रेमामध्ये वेड्या होत्या सोनी राजदान, पहिल्या पत्नीपासून दोन मुलीही होत्या अन्…

बॉलिवूड अभिनेत्री सोनी राजदान या आज आपला ६६ वा वाढदिवस साजरा करत आहे. २५ ऑक्टोबर १९५६ रोजी लंडनमध्ये जन्मलेल्या सोनी राजदान या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गणल्या जात होत्या. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असले, तरी त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ही इंग्रजी चित्रपटातून केली होती. सोनी राजदान या जितक्या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत येत होत्या. तितक्याच त्या प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत आल्या होत्या. दरम्यान, या प्रेमप्रकरणानंतर अखेर दोघांनी लग्न केलं असून या जोडीला आलिया नावाची मुलगी देखील आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा आम्ही सांगणार आहोत. (Soni Razdan and Mahesh Bhatt Lovestory)

सोनी यांचे वडील काश्मिरी पंडित, तर आई मूळ ब्रिटिश-जर्मन वंशाची होती. त्यांचे संपूर्ण बालपण मुंबईत गेले आहे. ‘जॉन फॉव्लेस’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तर, १९८३ मध्ये त्यांनी ‘मंडी’ चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर त्या ३६ चौरंगी लेन, आहिस्ता आहिस्ता, सरांश, त्रिकाल, खामोश अश्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी काम केलेलं आहे. दरम्यान, ‘सारांश’ चित्रपटादरम्यान सोनी राजदान यांची ओळख प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याबरोबर झाली. विशेष म्हणजे, सोनी यांना महेश भट्ट यांचं लग्न झाल्याचे व दोन मुली असल्याचे माहित होतं. तरीसुद्धा त्या महेश यांच्या प्रेमात इतक्या वेड्या झाल्या होत्या की, प्रसंगी त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा विचारही केला नव्हता.

हे देखील वाचा – हॉलिवूड अभिनेते रिचर्ड राऊंडट्री काळाच्या पडद्याआड, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

अखेर सोनी यांनी महेश यांना प्रेमाचं वचन दिलं. तेव्हा त्यांनी होकार देत लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर १९८६ मध्ये महेश भट्ट व सोनी राजदान यांचा विवाह झाला. त्यावेळेस असंही म्हटलं जात होतं की, महेश भट्ट यांनी सोनी राजदान यांच्याशी विवाह करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. पण त्यांच्या या रिती-रिवाजाचे कोणतेही फोटो त्यावेळी समोर आले नव्हते.

हे देखील वाचा – “इथून पुढे तुझं कठीण आहे”, देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर प्राजक्ता माळीवर चाहत्यांचा संताप, अभिनेत्री म्हणते, “काम होतं म्हणून…”

View this post on Instagram

A post shared by Soni Razdan (@sonirazdan)

एका मुलाखतीत सोनी यांना महेश भट्ट यांच्याबरोबरच्या लग्नानंतर त्यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती काय होती, याबद्दल विचारले होते. त्यावर त्या म्हणाल्या होत्या की, माझ्या लग्नानंतर माझ्या घरचे सुरुवातीला नाराज होते. मात्र, काही काळानंतर परिस्थिती बदलू लागली. तर दुसर्‍या एका मुलाखतीत महेश भट्ट यांनी त्यावेळी असे सांगितले होते की, जेव्हा सोनी या त्यांच्याजवळ येत होत्या. तेव्हा महेश यांनी त्यांना आपल्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. कारण, त्यावेळेस त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या येत होत्या. मात्र, सोनी यांनी त्यांचे म्हणणं ऐकलं नाही. त्यांनी महेश यांच्यासह लग्न करण्यासाठी आपलं संपूर्ण फिल्मी करिअरदेखील धोक्यात घातलं होतं.

Tags: Mahesh bhattsoni razdanSoni Razdan and Mahesh Bhatt Lovestorysoni razdan birthday
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Prashant Damle replies to netizens on his look

"चांगले कार्य करताना…", काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यावरुन प्रशांत दामलेंना नेटकऱ्याने सुनावलं, अभिनेत्याने दिलं उत्तर, म्हणाले, "उघडा..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.