१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शाफ्ट’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेले प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते रिचर्ड राऊंडट्री यांचे निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंजत होते. मात्र त्यांची ही झुंज अखेर अपयशी ठरली. रिचर्ड यांचे मॅनेजर पॅट्रिक मॅकमिन यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. रिचर्ड यांना हॉलिवूडचे अॅक्शन हिरो म्हणून ओळखले जात असे. त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुली आहे. विशेष म्हणजे, त्यांचे ३ चित्रपट हे प्रदर्शनाच्या मार्गावर होते. मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने हॉलिवूड त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Richard Roundtree passed away)
‘हॉलिवूड रिपोर्टर’ने दिलेल्या वृतानुसार, रिचर्ड राऊंडट्री हे गेल्या अनेक दिवसांपासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचार देखील सुरु देत होते. मात्र, त्यांची या रोगाशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी लॉस एंजेलिस येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. याआधी त्यांना १९९३ मध्ये स्तनाच्या कर्करोगचे निदान झाले होते. मात्र, त्यांनी या आजाराशी यशस्वी सामना केला होता. यावेळी त्यांचे मॅनेजर पॅट्रिक मॅकमिनन यांनी जाहीर केलेल्या अधिकृत पत्रकात म्हणाले, “रिचर्ड राऊंडट्री यांची कारकीर्द आणि त्यांचं कार्य हे अमेरिकन व आफ्रिकन चित्रपटसृष्टीसाठी मोठं योगदान दिलं असून त्यांचे हे योगदान कधीच विसरता येणार नाही.”
हे देखील वाचा – लग्नापूर्वीच एकत्र राहत आहेत अमृता देशमुख व प्रसाद जवादे?, दसऱ्यानिमित्त शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसली ‘ती’ गोष्ट, फोटो व्हायरल
Actor Richard Roundtree has died at the age of 81. pic.twitter.com/TOfBMGmGZ5
— Pop Base (@PopBase) October 25, 2023
१९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘शाफ्ट’ या चित्रपटातून रिचर्ड यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ज्यामध्ये त्यांनी जॉन शाफ्ट या खासगी गुप्तहेराची भूमिका साकारली होती. पुढे त्यांनी याच फ्रेंचाईझीतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना ‘अॅक्शन हिरो’ अशी एक वेगळी ओळख मिळाली. त्याचबरोबर, त्यांनी ‘स्टील’, ‘मूविंग ऑन’, ‘मैन फ्राइडे’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. रिचर्ड यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं असून त्यातील ३ चित्रपट ही प्रदर्शनाच्या मार्गावर होती.
हे देखील वाचा – रणबीर कपूर अभिनयक्षेत्रामधून घेणार ब्रेक, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, “चित्रपटांच्या चित्रीकरणांमुळे…”
त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, रिचर्ड यांनी दोन लग्न केली होती. ज्यातील पहिलं लग्न हे १९६३ मध्ये मॅरी जेन यांच्यासह झालं होतं. तर १९८० मध्ये त्यांनी करीन सेरेना यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, ही दोन्ही लग्न काही काळ टिकली. रिचर्ड यांना निकोल, टेलर, मॉर्गन, केली या चार मुली आहे.