सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“इथून पुढे तुझं कठीण आहे”, देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर प्राजक्ता माळीवर चाहत्यांचा संताप, अभिनेत्री म्हणते, “काम होतं म्हणून…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 25, 2023 | 6:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prajaktta mali troll to the photo with devendra fadnavis

Prajaktta mali troll to the photo with devendra fadnavis

मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच नाव अग्रक्रमावर घेतलं जातं. तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं अशी वेगळी जागा निर्माण केली आहे. प्राजक्ता अभिनयासह इतर क्षेत्रांमध्येही बरीच सक्रिय असते. ती एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण आता तिने ‘प्राजक्तराज’ या अलंकारीक विश्वातही स्वतःचं पाऊल ठेवलं आहे. तिने स्वतःचा असा एक दागिन्याचा नवा ब्रँन्ड आणला आहे. प्राजक्ता सध्या या दोन क्षेत्रांव्यतिरिक्त इतर क्षेत्रातही वावरताना दिसत आहे. विशेष म्हणजे राजकारणातील नेत्यांबरोबर तिच्या भेटीगाठी बऱ्याच वाढल्या आहेत. (Prajaktta mali share a post with nitin gadkari)

सध्या तिला राजकिय लोकांबरोबर बऱ्याचदा विविध कार्यक्रमात एकत्र पाहायला मिळते. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरींबरोबर स्टेजवर एकत्र दिसणं असो किंवा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांची घेतलेली भेट असो. या सर्वांबरोबरच्या फोटोंमुळे ती लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहे का?, यासारख्या बऱ्याच चर्चा सध्या रंगताना दिसत आहेत. त्यातच तिने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली. त्या संबंधीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आणखी वाचा – लग्नापूर्वीच एकत्र राहत आहेत अमृता देशमुख व प्रसाद जवादे?, दसऱ्यानिमित्त शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसली ‘ती’ गोष्ट, फोटो व्हायरल

या शेअर केलेल्या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबरच्या फोटोंसह नागपूरच्या कार्यक्रमाचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देत प्राजक्ता लिहीते, ‘खरे तर देवेंद्रजींच्या मतदारसंघातील गरबा कार्यक्रमासाठी नागपूरला गेले होते आणि त्यांच्याकडे एक कामही होतं. विजयादशमी उत्सवात भेटीसाठी तुमचा थोडा वेळ हवा असे मी म्हणताच, त्यांनी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून दिला. ‘काहीही मदत लागली तर सांगा, आम्ही तुम्हाला मदक करण्यासाठी येथे आहोत, आम्हाला तुमचे कार्य आवडते’, इति – देवेंद्रजी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असं म्हणतात तेव्हा खरच खूप आधार वाटतो. त्यांच्या या अनमोल वाक्यांसाठी त्यांचे आभार मानायले शब्द अपूरे पडतायेत’, असं लिहीत तिने उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

आणखी वाचा – Video : ‘जीभ वापरून बाण …’, रावण दहनाला गेलेल्या कंगन राणौतकडून घडली चूक, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. एका बाजूला  प्राजक्ताचं कौतुक होत आहे तर दुसऱ्या बाजूला ती बरीच ट्रोलही होत आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहीलं, ‘तुमच्यासाठी वेळ काढला पण एखादा सामान्य माणूस भेटायला गेला तर त्यांना ते भेटत नाहीत. तेव्हा त्यांना सामान्यांसाठी वेळ नसतो’, ‘मॅडम, थोडा आमच्या आरक्षणाबाबतही विचारा’, असं लिहीत त्याने आरक्षणाबाबतचाही प्रश्न उपस्थित केला. तर दुसऱ्या बाजूला नेटकऱ्याने तिचं कौतुक करत लिहीलं, ‘प्राजक्ताजी, तुमचा इथून पुढचा प्रवास कठीण आहे. पण देव तुमच्या बरोबर आहे. तुमच्या क्षेत्रातील लोक तुम्हाला संघी, मनुवादी वगैरे ठरवतील. पण तुम्ही तुमच्या विचाराने पुढे जात राहा’, असं लिहीत त्यांनी प्राजक्ताला पुढिल प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: deputy chief minister of Maharashtradevendra fadnavismarathi actressprajaktta mali
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Soni Razdan and Mahesh Bhatt Lovestory

महेश भट्ट विवाहित असूनही त्यांच्या प्रेमामध्ये वेड्या होत्या सोनी राजदान, पहिल्या पत्नीपासून दोन मुलीही होत्या अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.