शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुळ युकेचा, दुबईमध्ये राहतो अन्…; सोनाली कुलकर्णीचा नवरा नक्की काय काम करतो?, पहिल्यांदाच अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “मोठमोठ्या बँकांमध्ये…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 27, 2024 | 7:02 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Sonalee Kulkarni talk about her husband kunal bonedekar profession

मुळ युकेचा, दुबईमध्ये राहतो अन्...; सोनाली कुलकर्णीचा नवरा नक्की काय काम करतो?, पहिल्यांदाच अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "मोठमोठ्या बँकांमध्ये..."

मराठी मनोरंजन सृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. आपल्या अभिनय, सौंदर्य व उत्तम नृत्यकौशल्याने सोनालीने मराठी मनोरंजन विश्वात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. मराठीसह इतर भाषांतही सोनालीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठी, हिंदी भाषांत काम केल्यानंतर सोनाली आता दक्षिण सिनेसृष्टीकडे वळली आहे. नुकताच सोनालीचा ‘मलाइकोट्टाई वालीबान’ या मल्याळम चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

याच चित्रपटाच्या निमित्ताने सोनालीने नुकताच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या नवऱ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सोनालीने तिचा नवरा कुणाल हा लॉस अ‍ॅडजस्टरचे काम करत असल्याचे सांगितले. सोनालीने “कुणाल हा लॉस अ‍ॅडजस्टर आहे” असं म्हणताच त्यावर सिद्धार्थ पुन्हा तिला “ते काय असतं? असं विचारतो. यावर सोनाली त्याला उत्तर देत असं म्हणते की, “तो एखाद्या कंपनीमध्ये झालेला तोटा शोधण्याचे, त्यावर संशोधन करण्याचे काम करतो. अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे किंवा बँकांमध्ये काही तोटे होतात ते तोटे शोधण्याचं काम तो करतो. जेव्हा एखाद्या बँकेत फ्रॉड होतो, तेव्हा ते इन्शुरन्स कंपनीकडे जातात आणि ती इन्शुरन्स कंपनी यांच्या एजन्सीला तो तोटा शोधून काढण्यासाठी काम देते”.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

आणखी वाचा – “नेता ब्राम्हण म्हणून अपशब्द वापरले अन्…”, केतकी चितळेचा मनोज जरांगेंना अप्रत्यक्ष टोला, म्हणाली, “सर्कशीत असलेल्या कलाकारांवर…”

यापुढे ती असं म्हणाली की, “तो खूप हुशार आहे. तो सध्या दुबईला राहतो. पण तो मूळचा युकेचा आहे. त्याला माझ्या असण्याबद्दल आणि माझ्या कामाबद्दल काहीही ठाऊक नव्हतं. आजही तो या सगळ्या मनोरंजन जगापासून दूर आहे. त्याला या क्षेत्राशी फार काही घेणंदेणं नाही. पण हो तो माझ्या कामाची प्रशंसा करतो. मला प्रोत्साहनही देतो आणि त्याचा मला पाठिंबाही आहे”.  

आणखी वाचा – Video : सिंधुदूर्गामधील स्वतःच्या गावी पोहोचले आदेश बांदेकर, नदीमध्ये पोहण्याचा आनंदही लुटला अन्…; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान,  सोनालीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत आणि तिच्या प्रत्येक भूमिकांना प्रेक्षकांनीही तितकाच चांगला प्रतिसाद दिला आहे. अशातच आगामी काळात तिचा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट चाहत्यांच्या  भेटीला येणार आहे. त्यामुळे अनेकांना तिच्या या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे.   

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainment newsMarathi newssonalee kulkarniमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीसोनाली कुलकर्णी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Next Post
actor Shyam Rajput Emotional Moment

“सात ते आठ मिनिटं लेक मला मिठी मारुन होता अन्...”, श्याम राजपूत यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग म्हणाले, “जेव्हा माझ्या घरात...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.