छोट्या पडद्यावरील ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय शोमधून “दार उघड बये दार उघड” असं म्हणत अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले अभिनेते, निवेदक म्हणजे आदेश बांदेकर. आदेश बांदेकर हे मनोरंजन क्षेत्रासह राजकारणातही तितकेच सक्रिय आहेत. रंगभूमी, होम मिनिस्टर आणि याशिवाय राजकीय कार्यक्रम यानिमित्ताने आदेश यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ते प्रवास करत असतात. यादरम्यान त्यांना येणारे अनुभव, किस्से, काही खास आठवणी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक छान व्हिडीओ शेअर केला आहे.
आदेश बांदेकर हे कोकणातले असून सध्या ते त्यांच्या सिंधुदुर्ग या गावी सुट्ट्यांचा अनानंद घेत आहेत. सिंधुदुर्गमधील वाडोस हे त्यांचं गाव असून आदेश त्यांच्या गावी एका नदीत पोहोण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. त्यांच्या गावच्या कर्ली नदीत ते पोहोण्याचा आनंद लुटत आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे काही नातेवाईकही नदीत पोहताना दिसत आहेत. आदेश बांदेकर यांनी त्यांचा नदीत पोहतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आदेश यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांच्या गावचे निसर्गसौंदर्य पाहायला मिळत आहे. संध्याकाळी मावळतीच्या क्षणी आदेश यांनी नदीत पोहण्याचा आनंद लुटला असून त्यांच्या चेहऱ्यावर नदीत पोहण्याचा आनंद ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. आदेश त्यांच्या व्यस्त वेळापत्राकातून वेळ काढत त्यांच्या गावी सुट्टी एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा – ना भरजरी साडी, ना लेहेंगा; लग्नानंतरचा मिसेस बोडकेचा नवा लूक पाहिलात का? साधेपणाने वेधलं लक्ष
दरम्यान, आदेश बांदेकर हे सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या कायमच संपर्कात राहत असतात. अशातच त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईकस व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओखाली त्यांच्या गावच्या नदीत पोहण्याच्या काही आठवणीदेखील शेअर केल्या आहेत.