संपूर्ण महाराष्ट्रात “होम मिनिस्टर” या कार्यक्रमातून आदेश बांदेकर घराघरात पोहोचले. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या दोघांनंतर आता त्यांचा मुलगा सोहम बांदेकर याने सुद्धा मराठी सिनेसृष्टीत पाउल टाकले. सोहम “नवे लक्ष” या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नवे लक्ष ह्या कार्यक्रमाची निर्मिती स्वतः आदेश बांदेकरांनी केली होती. याचबरोबर सोहम सोशल मीडियावर फोटोज आणि व्हिडीओज शेअर करतच असतो. सोहमने नुकतीच बाबा आदेश बांदेकरांसोबत एक पोस्ट शेअर केली आहे. (Soham Aadesh Bandekar Twinning)

सोहमने पोस्ट केलेल्या फोटो मध्ये सोहम आणि त्याच्या बाबांनी सेम रंगाचे कपडे वेअर केले आहेत. सोहमने या पोस्टला “Twinned Up Coincidentally Couldn’t let the opportunity slip away” असे कॅप्शन दिले आहे. सोहमच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी “खूपच छान, तुम्हा दोघांना एकत्र बघणं हे नेहमीच आनंददायी असतं” तसेच “दोन सकारात्मक उर्जा” अशा कमेंट्स केल्या आहेत.
हे देखील वाचा: साईशा झाली मल्हारची नवीन हेअरस्टाईलीश,व्हिडीओ व्हायरल
आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर अनेक मालिकांमध्ये काम करून नावारूपाला आले. अतिशय कठीण परिस्थितून आलेल्या कोणत्याही संकटाचा सामना करून मराठी सिनेविश्वात त्यांनी स्वःचा पाया मजबूत केला. आता सोहमने सुद्धा या क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे त्याचे आईबाबा उत्साही तसेच आनंदी आहेत. आता सोहम बांदेकर मोठ्या पडद्यावर कधी पदार्पण करणार या बद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. (Soham Aadesh Bandekar Twinning)
हे देखील वाचा: ‘आणि म्हणून माझ्या घरी त्यांचं येणं राहून गेलं..’ म्हणत मिलिंद गवळी झाले भावुक
सोहमची आई सुचित्रा बांदेकर ही सुद्धा उत्तम अभिनेत्री आहे. सुचित्रा आपल्याला झिम्मा या चित्रपट दिसल्या होत्या. आता सुचित्रा या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात देखील झळकणार आहेत. या आधी सुचित्रा या अनेक हिट मराठी सिनेमात काम केले आहे. “मी शिवाजी राजे भोसले बोलतोय” या सिनेमात त्यांनी साकारलेली आई प्रेक्षकांना खूप आवडली होती.v