वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात.आणि या मालिका कमी वेळातच चाहत्यांना आपलंस करतात.आणि काही कालावधी नांतर प्रेक्षकांचा निरोप घेतात.अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे
अजूनही बरसात आहे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं.या मालिकेचा मोठा चाहता वर्ग होता.मालिकेत उमेश कामत आणि मुक्ता बर्वे ही मुख्य भूमिकेत झळकले होते.मालिकेत उमेश आदिराजची भूमिका तर मुक्ता मीराची भूमिका साकारत होते. मीरा आणि आदिराज यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता या मालिकेतील आदिराजने चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे.या मालिकेचा लवकरच दुसरा भाग येण्याची शक्यता आहे. उमेश कामत यांनी एक फोटो पोस्ट करत माहिती दिली.(Umesh Mukta)
अभिनेता उमेश कामत सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याचे फोटो व व्हिडिओद्वारे कामाच्या अपडेट देत असतो. असाच एक फोटो शेअर करत त्याच्या आगामी प्रोजेक्टची हिंट दिली आहे.उमेश कामतने अजूनही बरसात आहे..या मालिकेतील कलाकरांसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने जी कॅप्शन दिली आहे, त्यावरून त्याने नवीन प्रोजेक्ट्ची माहिती दिली. उमेश कामतनं म्हटलं आहे की, तिघेही भेटलोय एका खास कामासाठी जून मध्ये कळेलच.. तर आता चाहते जून महिन्याची वाट पाहत आहे. पण आता या तिघांचं नाटक येणार की मालिका की कोणता चित्रपट ही अद्याप अस्पष्ट आहे.
हे देखील वाचा – समीरने रसिकाला दिली कौतुकाची भेट
त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याच्या अजूनही बरसात आहे मालिकेच्या पार्ट 2 बद्दल अंदाज व्यक्त केला आहे. तर या फोटोवर चाहत्यांनी व्हा व्हा आवडेल, अजूनही बरसात हणार आहे का?, अजूनही बरसात होणार आहे २, अश्या अनेक कॉमेंट केल्या आहेत.तर चाहते फादेखील आदिराज आणि मीरा यांची केमिस्ट्री पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.(Umesh Mukta)
मुक्ता आणि उमेश यांनी लग्न पाहावे करून या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांनतर तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा अजूनही बरसत होतं आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली.