सध्याच्या सक्रिय राजकारणातील काही महत्त्वाच्या राजकीय मंडळींपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे स्मृती इराणी. टेलिव्हिजन विश्वात सर्वात गाजलेल्या ‘क्योकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून साकारलेली तुलसी घराघरांत पोहचल्या आणि स्मृती इराणी सर्वांच्या लाडक्या झाल्या. त्यानंतर त्यांनी राजकारणात सहभाग घेतला आणि आता महिला आणि बाल विकास मंत्री म्हणून स्मृती ईराणी यांचे काम गाजत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत स्मृती यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची विशेष आठवण करून दिली. यावेळी त्यांनी एकता कपूरने जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिने मला या शोसाठी नाकारलं होतं. मात्र, नंतर त्यांनी ज्योतिषाच्या सांगण्यावरुन मालिकेत घेतल्याचा खुलासा केला.
याबद्दल त्या म्हणाल्या की, “त्या दिवशी एकता कपूरच्या ऑफिसमध्ये जनार्दन नावाचे एक ज्योतिष बसले होते. त्यांनी मला सांगितलं की, “एक दिवस तू खूप मोठी कलाकार होणार आहेस”. ते माझ्याशी बोलत असताना मी एका कॉन्ट्रॅक्टवर सही करत होते. प्रत्यक्षात ती भूमिका कोणाच्या तरी बहिणीची वगैरे होती. परंतु, हे सगळं पडद्यामागे बसलेल्या एकता कपूरने पाहिलं. त्यांनी एकताला सांगितलं की, “तू हिच्याबरोबर काम केलंस तर, एक दिवस ही मुलगी देशभरात प्रसिद्ध होईल”.
यापुढे त्या असं म्हणाल्या की, “पंडितजींचं बोलणं ऐकून एकता लगेच मी नेमक्या कोणत्या करारावर सही करतेय हे पाहण्यासाठी बाहेर आली. एकताने ते संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट पाहिलं आणि फाडून टाकलं. त्यानंतर तिने मला तुलसी विरानीच्या भूमिकेसाठी माझी निवड केली. या भूमिकेसाठी एकताने मला किती पगार पाहिजे याबद्दल विचारलं तेव्हा तिला मी बाराशे रुपये प्रतिदिवस सांगितलं होतं. पण, एकताने स्वत:हून त्या करारावर अठराशे प्रतिदिवस मानधन लिहिलं होतं”.
यापुढे त्यांनी आपल्या संघर्षाबद्दल म्हटले की, “मी मॅकडोनाल्डमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होते, ज्यामध्ये मला दरमहा १८०० रुपये मिळत होते. आठवड्यातून सहा दिवस तिथे काम करायची आणि सुट्टीच्या दिवशी मी ऑडिशन देत असे. दरम्यान, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही या मालिकेमुळे स्मृती इराणींनी मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. मात्र ही मालिका संपल्यावर काही वर्षांनी त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला.