गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याची जागा…”, निलेश साबळेनंतर सुत्रसंचालक म्हणून ‘चला हवा येऊ द्या’मध्ये संकर्षण कऱ्हाडे, म्हणाला, “त्याने निर्माण केलेलं…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 13, 2024 | 3:08 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Sankarshan Karhade talked about why he will anchoring Chala Hawa Yeu Dya instead of dr. Nilesh Sable

"त्याची जागा...", निलेश साबळेनंतर सुत्रसंचालक म्हणून 'चला हवा येऊ द्या'मध्ये संकर्षण कऱ्हाडे, म्हणाला, "त्याने निर्माण केलेलं..."

मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण हा एक उत्तम लेखक, कवी व संवादकार असल्यामुळे त्याचे लिखाण व बोलणं ऐकणे हेदेखील त्याच्या चाहत्यांना भलतेच आवडत असते. त्याचबरोबर तो निवेदकाची भूमिकाही अगदी दमदार पद्धतीने वठवतो. आजवर त्याने अनेक लोकप्रिय कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व निवेदन केले आहे.

अशातच संकर्षण झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाचेदेखील निवेदन करणार आहे. याचनिमित्ताने संकर्षणने ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. यावेळी त्याला त्याच्या या कार्यक्रमाच्या निवेदनाच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले. याचे उत्तर देत संकर्षणने असं म्हटलं की, “मी या कार्यक्रमाचा पूर्ण वेळ निवेदक नाही. माझा मित्र डॉ. निलेश साबळे याची ही जागा आहे. तेच या कार्यक्रमाचे सूत्रधार, लेखक, दिग्दर्शक आहे. त्यामुळे निलेश साबळेची जागा आमच्यापैकी कुणीही घेऊ शकत नाही”.

आणखी वाचा – Video : यालाच म्हणतात संस्कार! गावी जाऊन भजनी मंडळींमध्ये रमला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, अंगणात बसून भजन गातानाचा व्हिडीओ व्हायरल

यापुढे संकर्षणने असं म्हटलं की, “चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आता काही वेळासाठी निरोप घेत आहे. त्यामुळे या निरोप समारंभासाठी पाहून निवेदक म्हणून मी निवेदन करणार आहे. मी या कार्यक्रमाचा पूर्णवेळ निवेदक नाही आणि माझी तशी इच्छाही नाही. याचं कारण असं की ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम म्हटलं की, निलेश साबळे हेच नाव येतं. कारण या शोमध्ये त्याची एक वेगळी जागा आहे आणि ती त्याने निर्माण केली आहे. त्यामुळे मी पाहुणा निवेदकाची भूमिका साकारणार आहे”.

आणखी वाचा – बायकोला पुरस्कार मिळताच नाचू लागला प्रसाद जवादे, पुरस्कार मिळाल्यानिमित्त अमृताला देणार ‘हे’ खास गिफ्ट, म्हणाला…

दरम्यान, संकर्षणचे रंगभूमीवर सध्या ‘नियम अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ या नाटकांसह त्याचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांचा कार्यक्रमही सुरू आहे. त्याचबरोबर तो काही कार्यक्रमांचे निवेदनही करत आहे. त्यामुळे त्याचे अनेक चाहते मंडळी त्याच्या अभिनयासह सूत्रसंचालनाचे देखील कौतुक करत असतात.

Tags: संकर्षण कऱ्हाडेमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी बातमीentertainment newsmarathi actormarathi entertainment newsMarathi newssankarshan karhade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Prasad Jawade On Her Mother In Law

"सासूबाईंचं नाव घेताच घाम फुटतो कारण…", प्रसाद जवादेला सासरच्या मंडळींकडून कशी मिळते वागणूक?, म्हणाला, "वेळ-काळ समजून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.