शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कोणाची आई घरकाम करते, तर बाबा ऑटो चालवत…”, रिएलिटी शोच्या ड्रामावर राहुल वैद्यचं भाष्य, सगळं खोटं म्हणत…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 9, 2025 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rahul Vaidya on reality shows

“कोणाची आई घरकाम करते, तर बाबा ऑटो चालवत...”, रिएलिटी शोच्या ड्रामावर राहुल वैद्यचं भाष्य, सगळं खोटं म्हणत...

गेल्या काही वर्षांमध्ये टीव्ही इंडस्ट्रीची एकूणच गणितं बदलताना दिसत आहेत. मालिकांच्या कथा, पात्र, कलाकार सगळ्याचीच चमक-धमक अगदी वेगळीच दिसते. काही वर्षांपूर्वी सासू-सूनांचा ड्रामा मालिकांमध्ये तुफान चालत होता. आताही त्याच कथा पण एका नव्या स्वरुपात पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने टेलिव्हीजन विश्वामध्ये रिएलिटी शोची एक वेगळीच लाट आली. यामध्ये डान्स, गायन अशा विविध रिएलिशी शोजनी प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. काही वर्ष सगळं छान आणि उत्तम वाटत असतानाच वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या. रिएलिटी शो स्क्रिप्टेड असतात असं बोललं जाऊ लागलं. काही अंशी ते खरंही असल्याचं समोर आलं. याचबाबत आता गायक राहुल वैद्यने भाष्य केलं आहे. (Rahul Vaidya on reality shows)

‘इंडियन आयडल’ या रिएलिटी शोमुळे राहुल वैद्य नावारुपाला आला. राहुलच्या आवाजाची जादू आजही प्रेक्षकांवर आहे. आताचे सगळेच रिएलिटी शो स्क्रिप्टेड असल्याचा दावा त्याने केला आहे. आपण गरीब आहोत असं सांगत टीआरपी वाढवायचा, वोट मिळवायचे हेच रिएलिटी शोचं सत्य असल्याचं राहुलचं म्हणणं आहे. याचबाबत त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अगदी उघडपणे भाष्य केलं.

आणखी वाचा – “नातं टिकलं नाही तरी दोष स्त्रियांनाच आणि…”, लग्नाबाबत ‘आई कुठे…’ फेम मधुराणीचं वक्तव्य, म्हणाली, “नाजूक वयात निर्णय…”

View this post on Instagram

A post shared by RAHUL VAIDYA (@rahulvaidyarkv)

राहुलने रिएलिटी शोबाबत सांगितलं की, “रिएलिटी शो आता स्क्रिप्टेड झाले आहेत. प्रत्येक शोचा एक पॅटर्नच आहे. एक त्यामध्ये लव्ह अँगल असतो. कोणाची तरी आई कोणाच्या तरी घरी घरकाम करत असते. कोणाचे तरी वडील ऑटो चालवत असतात. यामधलं काहीच नसेल तर असंच बोला तसंच बोला असं सांगितलं जातं. पण पहिलं असं काहीच नव्हतं”.

आणखी वाचा – आजारपणातही ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी करतेय शूट, नेहमी सलाईन लावते अन्…; स्वतःच सांगितली परिस्थिती

“मी गरीब आहे असं बोलून जर लोक वोट करत असतील आणि हे मला आधीच माहिती असतं तर मी तेच केलं असतं. पण तेव्हा सगळं काही खरं होतं. पण आताचे गायनाचे रिएलिटी शो खरेच आहेत हे ठामपणे मी सांगू शकत नाही”. ‘इंडियन आयडल’च्य पहिल्या पर्वाचा राहुल स्पर्धक आहे. या शोमधूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर बरीच वर्ष तो इंडस्ट्रीमध्ये फारसा दिसला नाही. ‘बिग बॉस १४’मध्ये सहभागी झाल्यानंतर त्याचं आयुष्य पुन्हा बदललं.

Tags: bollywood newsentertainment newsrahul vaidya
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
jamie lever revealed horrible experience

“त्याने हस्तमैथून करण्यास सुरुवात केली अन्...”, जॉनी लिव्हर यांच्या लेकीबरोबर घाणेरडा प्रकार, म्हणाली, “कारच्या बाजूला तो...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.