गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याने हस्तमैथून करण्यास सुरुवात केली अन्…”, जॉनी लिव्हर यांच्या लेकीबरोबर घाणेरडा प्रकार, म्हणाली, “कारच्या बाजूला तो…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 9, 2025 | 7:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
jamie lever revealed horrible experience

“त्याने हस्तमैथून करण्यास सुरुवात केली अन्...”, जॉनी लिव्हर यांच्या लेकीबरोबर घाणेरडा प्रकार, म्हणाली, “कारच्या बाजूला तो...”

बालपणात किंवा कळत्या वयात विविध प्रसंग घडतात जे कायमस्वरुपी स्मरणात राहतात. अनेकदा काही वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्या काळामध्ये वाटणारी भीती कायमच मनात पेरली जाते. असंच काहीसं सुप्रसिद्ध अभिनेते जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमीच्या बाबतीत घडलं आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना बऱ्याच स्त्रियांना अनेकदा विचित्र प्रसंगांचा सामना करावा लागतो. चुकीच्या ठिकाणी घाणेरडा स्पर्श असो वा घाणेरडी नजर हे वाईट अनुभव स्त्रियांना काही नवे नाहीत. जेमीलाही हा प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. त्याची छाप अजूनही तिच्या मनावर आहे. नुकतंच तिने याबाबत उघडपणे भाष्य केलं. (jamie lever revealed horrible experience)

जेमीने नुकतीच हॉटरफ्लायला मुलाखत दिली. यावेळी तिने वाईट प्रसंगांबाबत सांगितलं. ती म्हणाली, “त्यावेळी मी मुंबईतील विलेपार्ले परिसरातील जमनाबाई नरसी इंटरनॅशल शाळेमध्ये शिकत होते. माझ्या ड्रायव्हरने शाळा सुटल्यानंतर कारमध्ये बसायला सांगितलं. मी माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर कारच्या पाठच्या सीटवर बसले होते. आम्ही माझ्या भावाची वाट बघत होतो. एक माणूस आला आणि आमच्या गाडीच्या बाहेर तो उभा होता. त्याने पँटची चैन खोलली आणि हस्तमैथून करु लागला”.

आणखी वाचा – “वैष्णवीच्या जागी अंकिता दिसली असती”, हगवणे घटनेवरुन अंकिता वालावलकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, “आई-वडील चुकले…”

View this post on Instagram

A post shared by Jamie Lever (@its_jamielever)

“मी खूपच घाबरले होते. तो नक्की काय करत आहे? हे मला कळत नव्हतं. मी थरथर कापू लागले. कारण मला वाटत होतं की, तो आता गाडीचा दरवाजा उडणार की काय?. मी हळूच दरवाजा पूर्ण बंद केला. आम्ही त्याच्याकडे बघत नाही हे त्याला कळाल्यावर तो तिथून निघून गेला. पण मी हा प्रकार माझ्या आई-वडिलांनाही सांगितला नाही. कारण तेव्हा मला खूपच धक्का बसला होता”.

आणखी वाचा – “नातं टिकलं नाही तरी दोष स्त्रियांनाच आणि…”, लग्नाबाबत ‘आई कुठे…’ फेम मधुराणीचं वक्तव्य, म्हणाली, “नाजूक वयात निर्णय…”

पुढे जेमीने आणखी एक घटना सांगितली. ती म्हणाली, “एकदा अंधेरी स्टेशनला मी पायऱ्या उतरत होते. एक माणूस माझ्या समोर आला. त्याने घाणेरडं कृत्य करण्यास सुरुवात केली. माझ्या मित्राने मला खेचलं आणि पुढे चालत राहा म्हणून सांगितलं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप त्रास देतात. आता मला असं वाटतं की, स्वतःसाठी प्रतिकार करण्याची ताकद आता माझ्याकडे आहे”. जेमीने सांगितलेले प्रसंग खरंच खूपच धक्कादायक होते.

Tags: bollywood newsentertainment newsjohny lever
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Usha Nadkarni Son

"'बिग बॉस'मध्ये जाणार हे मला सांगितलं नाही", उषा नाडकर्णींच्या मुलाचा खुलासा, म्हणाला, "आईने एकदा ठरवलं की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.