गायक राहुल वैद्यने त्याच्या सुंदर गाण्यानी चाहत्यांच्या मनावर राज्य केले. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत सगळ्यांना आनंदाची बातमी दिली. “मी बाबा झालो” म्हणत चाहत्यांबरोबर त्याने सुंदर क्षण सेलिब्रेट केले. सध्या तो पत्नी दिशा परमारसह नवं आयुष्य एण्जॉय करत आहे. दोघेही लेकीबरोबरचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. आता जवळपास दोन महिन्यांनी राहुल व दिशाने लेकीचं बारसं केलं आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. (Singer Rahul Vaidya Naming Ceremony Photo Viral)
२० सप्टेंबरला दिशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. गरोदरपणातील प्रत्येक क्षणही तिने आनंदाने साजरे केले. दिशाच्या डोहाळे जेवणाचीही बरीच चर्चा रंगली होती. दिवाळीच्या मुहूर्तावर लेकीचं बारसं करायचं असं दोन्ही कुटुंबीयांचं ठरलं. त्याचप्रमाणे राहुल व दिशाच्या मुलीचं बारसं पार पडलं आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त वैद्यांच्या घरी बारशाचं जोरदार सेलिब्रेशन झालं. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या सोहळ्याला त्यांचे जवळचे कुटुंबीय व काही मित्रमंडळी उपस्थित होते. अगदी मराठमोळ्या पद्धतीन बारसं करत राहुल-दिशा यांनी त्यांच्या मुलीचे नाव ‘नव्या’ असे ठेवले आहे. लग्नानंतर दिशा नेहमीच सणांना पारंपरिक लूकमध्ये दिसली. लेकीच्या बारश्यालाही तिने पारंपरिक लूक करायचं ठरवलं. दिशाच्या या लूकचेही कौतुक होत आहे.

दिशाने या बारशानिमित्त केशरी व गुलाबी रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. तर या सोहळ्यात राहुल शेरवानीमध्ये दिसला. त्याचबरोबर आपल्या लेकीलाही त्यांनी आपल्या कपड्यांना जुळणाऱ्या रंगाचा फ्रॉक घातला होता. त्याचबरोबर मुलीसाठी खास पाळणा तयार केला आहे. दरम्यान या फोटोखाली चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईकसचा वर्षाव केला आहे.