गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राहुल वैद्य व दिशा परमारच्या लेकीचं महाराष्ट्रीयन पद्धतीने थाटामाटात बारसं, मुलीचं नाव ठेवलं…

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 15, 2023 | 12:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
singer rahul vaidya and disha parmar baby name is navya naming ceremony photo viral

राहुल वैद्य व दिशा परमारच्या लेकीचं महाराष्ट्रीयन पद्धतीने थाटामाटात बारसं, मुलीचं नाव ठेवलं...

गायक राहुल वैद्यने त्याच्या सुंदर गाण्यानी चाहत्यांच्या मनावर राज्य केले. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत सगळ्यांना आनंदाची बातमी दिली. “मी बाबा झालो” म्हणत चाहत्यांबरोबर त्याने सुंदर क्षण सेलिब्रेट केले. सध्या तो पत्नी दिशा परमारसह नवं आयुष्य एण्जॉय करत आहे. दोघेही लेकीबरोबरचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. आता जवळपास दोन महिन्यांनी राहुल व दिशाने लेकीचं बारसं केलं आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.  (Singer Rahul Vaidya Naming Ceremony Photo Viral)

२० सप्टेंबरला दिशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. गरोदरपणातील प्रत्येक क्षणही तिने आनंदाने साजरे केले. दिशाच्या डोहाळे जेवणाचीही बरीच चर्चा रंगली होती. दिवाळीच्या मुहूर्तावर लेकीचं बारसं करायचं असं दोन्ही कुटुंबीयांचं ठरलं. त्याचप्रमाणे राहुल व दिशाच्या मुलीचं बारसं पार पडलं आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त वैद्यांच्या घरी बारशाचं जोरदार सेलिब्रेशन झालं. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.        

View this post on Instagram

A post shared by RAHUL VAIDYA (@rahulvaidyarkv)

आणखी वाचा – अंकिता लोखंडे गरोदर? ‘बिग बॉस १७’च्या घरात पहिल्यांदाच खरं काय ते बोलून गेली अभिनेत्री, म्हणाली, “मला आंबट खाण्याचं…”

या सोहळ्याला त्यांचे जवळचे कुटुंबीय व काही मित्रमंडळी उपस्थित होते. अगदी मराठमोळ्या पद्धतीन बारसं करत राहुल-दिशा यांनी त्यांच्या मुलीचे नाव ‘नव्या’ असे ठेवले आहे. लग्नानंतर दिशा नेहमीच सणांना पारंपरिक लूकमध्ये दिसली. लेकीच्या बारश्यालाही तिने पारंपरिक लूक करायचं ठरवलं. दिशाच्या या लूकचेही कौतुक होत आहे.    

आणखी वाचा – “फार गोड वाटते परदेशाची वारी…”, संकर्षण कऱ्हाडेने सादर केलेली कविता ऐकून तुम्हीही थक्क व्हाल, म्हणाला, “जेव्हा गोऱ्यांचं पोर…”

दिशाने या बारशानिमित्त केशरी व गुलाबी रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. तर या सोहळ्यात राहुल शेरवानीमध्ये दिसला. त्याचबरोबर आपल्या लेकीलाही त्यांनी आपल्या कपड्यांना जुळणाऱ्या रंगाचा फ्रॉक घातला होता. त्याचबरोबर मुलीसाठी खास पाळणा तयार केला आहे. दरम्यान या फोटोखाली चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईकसचा वर्षाव केला आहे.   

Tags: disha parmarentertainment newsrahul vaidya
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
Rubina Dilaik Troll

"ही बाई एकेकाळी…", गरोदरपणात केलेल्या ग्लॅमरस फोटोशूटवरून रुबिना दिलैक ट्रोल, नेटकरी म्हणाले, "शरीरापेक्षा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.