‘बिग बॉस’मुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे रुबिना दिलैक. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. ‘बिग बॉस’ विजेती या अभिनेत्रीने काही काळ सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला आहे. काही काळ कलाविश्वापासून दूर असलेल्या अभिनेत्रीने याचं कारण ही साऱ्यांसमोर आणलं. लवकर रुबिना आई बनणार असल्याची आनंदाची बातमी तिने चाहत्यांसह शेअर केली आहे. तेव्हापासून रुबिना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रुबिनाने बेबी बंप दाखवत ही गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. (Rubina Dilaik Troll)
रुबिना व अभिनव सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही पोस्ट शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अलीकडेच, रुबिना दिलैकने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून गरोदरपणातील फोटोशूटच्या फोटोंची झलक शेअर केली होती. या फोटोशूटमुळे रुबिना विशेष चर्चेचा विषय ठरली. रुबिना व अभिनव या दोघांनीही पांढर्या रंगाचे कपडे परिधान करत हे खास फोटोशूट केलं होतं यानंतर आता पुन्हा एकदा रुबिनाने नवं कोर फोटोशूट करून ते फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.
रुबिनाच्या गरोदरपणातील या नव्या फोटोशूटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रुबिनाने सोनेरी जरीचा ड्रेस घातलेला पाहायला मिळतोय. शिवाय या ड्रेसला साजेशी अशी गोल्डन ज्वेलरीही तिने परिधान केली आहे. या फोटोशूटसह तिने लक्षवेधी असं कॅप्शनही दिलं आहे. रुबिनाने या आधी केलेल्या फोटोशूटवरून भलतीच ट्रोल झालेली पाहायला मिळाली. शिवाय आता पुन्हा एकदा नव्या फोटोशूटवरून ही रुबिना नेटकऱ्यांच्या कचाट्यात अडकली आहे.
यावर नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “ही बाई एकेकाळी देव कृष्णाची भक्ती करणारी भूमिका करत होती, हे सारं खोटं होतं”, तर आणखी एका युजरने तिचा भरजरी ड्रेस पाहून, “शरीरापेक्षा ड्रेस मोठा आहे” असं म्हटलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने “इतकं शोऑफ का करतेय” असं म्हणत कमेंट केली आहे.