शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

असा पार पडला मुग्धा वैशंपायनचा पदवी प्रदान सोहळा, खास व्हिडीओ शेअर करत व्यक्त केल्या भावना, म्हणाली…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 13, 2024 | 4:34 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Singer Mugdha Vaishampayan shared a special video of her convocation ceremony

असा पार पडला मुग्धा वैशंपायनचा पदवी प्रदान सोहळा, खास व्हिडीओ शेअर करत व्यक्त केल्या भावना, म्हणाली...

छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय शोमधून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे मुग्धा वैशंपायन. या शोमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. मुग्धा विविध ठिकाणी तिच्या गाण्यांचे कार्यक्रम करते. याचे काही खास व्हिडीओही ती सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतीच मुग्धाने भारतीय शास्त्रीय संगीतात पदव्युत्तर पदवी संपादन केली असून या अभ्यासक्रमात तिने मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे मुग्धावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुग्धाच्या या पदवी प्रदान सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच तिने आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडीओद्वारे तिने तिच्या या पदवी प्रदान सोहळ्याची खास झलक दाखवली आहे. मुग्धाला सुवर्ण पदक मिळताच तिच्यावर अनेक चाहत्यांसह, तिच्या कुटुंबियांनी व मित्रपरिवाराने कौतुकाचा वर्षाव केला होता. अशातच मुग्धाने नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडीओलाही चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

आणखी वाचा – ‘भूल भुलैया ३’मध्ये कार्तिक आर्यन व विद्या बालनसह झळकणार माधुरी दीक्षित, साकारणार ‘ही’ खास भूमिका, प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता

मुग्धाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्यासह तिचे आई-वडीलही पाहायला मिळत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला मुग्धा आपल्या वडिलांना “आपण कुठे जात आहोत?” असे विचारताच तिचे वडील “आपण मुंबई विद्यापीठात मुग्धाच्या पदवी प्रदान सोहळ्याला मुग्धाला मिळालेले सुवर्ण पदक आणायला जात आहोत” असं म्हणतात. यानंतर मुग्धा आई-वडीलांसह मुंबई विद्यापीठात आल्याचेही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. तसेच यापुढे मुग्धाने मुंबई विद्यापीठाच्या आसपासचा परिसर दाखवला आहे आणि यानंतर मुग्धाचे पदवी व सुवर्ण पदक स्वीकारतानाचे काही खास क्षणही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक वेट्री दुराईसामी यांचे निधन, ९ दिवसांनंतर सापडला मृतदेह, हिमाचलमध्ये झाला होता अपघात

हा खास व्हिडीओ शेअर करत मुग्धाने “माझा पदवी प्रदान सोहळा असा पार पडला” असं म्हणत “तुम्हा सर्वांसाठी हा खास व्हिडीओ शेअर करत आहे” असंही म्हटलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुग्धाने तिच्या पदवी प्रदान सोहळ्याचे फोटो शेअर केले होते आणि तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे मुग्धाचे कौतुक केले होते. तसेच मुग्धाने शेअर केलेल्या या व्हिडीओवरही चाहत्यांनी कमेंट्सद्वारे पुन्हा एकदा अभिनंदन व कौतुक केले आहे.          

Tags: entertainment newsmarathi entertainment newsMarathi newsmarathi singermugdha vaishampayanमनोरंजन बातमीमराठी गायिकामराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीमुग्धा वैशंपायन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Pavitra Punia And Ejaj Khan Sepretion

पवित्रा पुनिया व एजाज खानच्या नात्यात दुरावा, २ वर्षांनी वेगळे झाल्याबाबत अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली, "५ महिन्यांपासून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.