तमिळ कलाविश्वातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. दक्षिण चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक वेट्री दुराईसामी यांचं निधन झालं आहे. ९ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर सतलज नदीच्या किनारी वेट्री दुराईसामी यांचा मृतदेह सापडला आहे. त्यांच्या या निधनाच्या बातमीने कुटुंबियांसह मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. ४ फेब्रुवारीला झालेल्या कार अपघातानंतर वेट्री बेपत्ता होता. काही मीडिया वृत्तांनुसार, सोमवारी हिमाचल प्रदेशातील सतलज नदीत ४५ वर्षीय वेट्रीचा मृतदेह सापडला आहे. वेट्री चित्रपटासाठी लोकेशन पाहण्यासाठी शिमल्याला गेला होता असताना कार अपघातात ते बेपत्ता झाले होते.
वेट्री त्यांच्या मित्राबरोबर कारने प्रवास करत होते. काझाहून शिमल्याकडे जात असताना लाहौल-स्पिती भागात काशांग नाल्याजवळ त्यांची कार नदीत कोसळली होती. किन्नौर पोलीस, आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, होमगार्ड व गोताखोरांनी सतलज नदीच्या काठावर ४ फेब्रुवारीपासून संयुक्त शोध मोहीम राबवली होती. बेपत्ता वेट्री यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला होता.
Shocking and truly a wonderful gentleman I’ve known through my father and my friend Dr. Vetriselvi
— Dr. Anbu Arumugam (@AnbuArumugam5) February 13, 2024
Gone too soon #vetriduraisamy #RIP #saidaidiraisamy #manithaneyam #RIPVetriDuraisamy pic.twitter.com/EB8mzZ6qYl
आणखी वाचा – शीना बोरा हत्याकांडावर आधारित वेब मालिकेची तारीख आली समोर, जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार?
दुर्घटनेच्या दोन दिवसांनंतर वेट्री यांचे वडील सईदाई दुराईसामी यांनी त्यांच्या मुलाचा शोध घेणाऱ्याला १ कोटी रपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तसेच मुलाचा शोध घेण्यासाठी त्यांनी स्थानिकांना मदत करण्याचे आवाहनही केले होते आणि अखेर या शोध मोहिमेला यश आले असून या शोध मोहिमेत वेट्री यांचा मृतदेह मिळाला आहे.
दरम्यान, वेट्री यांच्या निधनावर आता अनेक कलाकार व राजकारण्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अनेकांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे दिवंगत वेट्री दुराईसामी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.