बॉलीवूड मनोरंजन विश्वातील नवोदित अभिनेता म्हणून सिद्धांत चतुर्वेदीकडे पहिले जाते. बॉलीवूडमधील काही तरुण व उमद्या अभिनेत्यांच्या यादीत त्याचे नाव येते. सिद्धांतने त्याच्या अवघ्या दोनच चित्रपटांद्वारे चाहत्यांमध्ये आपली लोकप्रियता मिळवली आहे. अभिनेत्याने रणवीर सिंहबरोबर ‘गल्ली बॉय’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तो दीपिका पदुकोणबरोबर ‘गहरिईयां’ चित्रपटामध्ये दिसला होता. अशातच सिद्धांतने ‘ब्रह्मास्त्र’सारख्या मोठ्या चित्रपटाला नकार दिल्यामुळे त्याला बॉलीवूडमधून बहिष्कार टाकण्यात आला असल्याचा खुलासा केला आहे.
नुकतंच ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धांतने याविषयी सांगताना असं म्हटलं की, “मला ‘गल्ली बॉय’च्या एक महिना आधी ‘ब्रह्मास्त्र’बाबत विचारण्यात आले होते. एका कास्टिंग दिग्दर्शकाच्या माध्यमातून मला या चित्रपटाबाबत विचारण्यात आले होते. पण चित्रपटासाठी मला स्क्रिप्ट किंवा ऑडिशन घेण्यात आले नव्हते. त्याने मला फक्त तू मार्शल आर्ट करतोस का? कारण हा एक ॲक्शनने भरलेला चित्रपट आहे. म्हणून तो म्हणाला की मी हे करावे आणि हा एक व्हीएफएक्सने भरलेला प्रकल्प आहे आणि त्याला बनवायला ५ वर्षे लागतील.”
यापुढे सिद्धांतने असं म्हटलं की, “मी कास्टिंग दिग्दर्शकाला सांगितलं की मी हा चित्रपट करू शकणार नाही.” यावर तो दिग्दर्शक उभा राहिला आणि म्हणाला, ‘तू वेडा आहेस का? या चित्रपटामुळे तू (धर्मा प्रोडक्शन)बरोबर जोडला जाणार आहेस?” यावर मी म्हणालो, “चित्रपटात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्टसारखे कलाकार असतील. तर मला कोण बघेल? आणि त्यात मला चित्रपटात एकही संवाद नाही, तर मला लोक बघणारच नाहीत.”
‘ब्रम्हास्त्र’नंतर सिद्धांतचे नाव ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आल्याचेही त्याने सांगितले. तसेच सिद्धांतला वेडा, रागीट आणि अंधश्रद्धाळू म्हणून बदनाम केले असल्याचेही त्याने म्हटले, दरम्यान, सिद्धांत चतुर्वेदी नुकताच अनन्या पांडे आणि आदर्श गौरव यांच्यासह ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटामध्ये दिसला होता