‘बिग बॉस ७’मध्ये दिसलेली सोफिया हयात ही नेहमी चर्चेत असते. सोफिया अध्यात्म गुरु बनली होती. नुकताच तिच्या आयुष्यात जो प्रकार घडला तो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. सोफियाला ३१ डिसेंबर २०२३ ला दुबई एअरपोर्टवर अटक केले आणि तुरुंगातही डांबले होते. तिने तिचा हा भयंकर अनुभव इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सर्वांबरोबर शेअर केला आहे. तिच्याबरोबर असं का घडलं? आणि या प्रसंगाला ती कशी सामोरी गेली? याबद्दल सांगितले आहे. (Sofia hayat viral post)
सोफियाने सांगितलं की, “माझा एक्स-बॉयफ्रेंड मुबारक आइसा मुबारक मोहम्मद अल मेराखीबरोबर लग्न करण्यासाठी दुबई येथे गेली होती. पण एअरपोर्टला पोहोचताच तिला अटक केले”. पण असे का केले याबद्दल कोणीही काहीही सांगण्यास तयार नव्हते.मी दुतावासामध्ये कॉल करण्याची विनंती केली. पण मला करु दिला नाही. पिंजऱ्यासारख्या छोट्याश्या तुरुंगात बंद करुन ठेवले होते. मला बरं वाटत नव्हतं”.
पुढे ती म्हणाली की, “६ तास तुरुंगात राहिल्यानंतर एक महिला पोलिस आली आणि मला पोलिस व्हॅनमधून दुबई पोलिस स्टेशनला घेऊन जाण्यात आले. त्या बंद गाडीत माझा श्वास गुदमरू लागला होता. मी त्यांना सारखी विचारत होते की मला का पकडण्यात आलं आहे? यावर त्यांनी मी एका व्यक्तीकडून ५ लाख ३२ हजार रुपये जबरदस्ती वसूल करत आहे आणि पैसे दिले नाही तर अश्लील व्हिडीओ शेअर करण्याची धमकीही देत आहे असे सांगितले. हे ऐकून मला धक्का बसला आणि मी रडू लागले. हा सर्व प्रकार माझ्या एक्स बॉयफ्रेंडनेच केला होता. त्याच्याकडून मला पैसे मिळणे बाकी होते पण त्याला माझे पैसे परत द्यायचे नव्हते म्हणून त्याने पोलिसांना खोटं सांगितलं होतं”.
नंतर सोफिया म्हणाली की, “जेव्हा पोलिसांनी माझा फोन तपासला तेव्हा मी पाठवलेला मेसेज पाहिला. त्यामध्ये मी लिहिले होते की, तू माझे पैसे दिले नाहीस तर मी तुझा चेहरा सोशल मीडियावर व्हायरल करेन आणि तू काय केलंस हे सर्व जगाला सांगेन. दुबईमध्ये असं करणं मोठा गुन्हा आहे. यासाठी २ वर्षाचा तुरुंगवास आणि ५०,००० पाउंड दंड लागू शकतो. माझ्या केवळ मेसेजमुळे मला त्यांनी सोडून दिले”.
सोफियाने तिची सर्व आपबिती सांगितली आहे. यावर नेटकरी अनेक प्रतिक्रियाही देत आहेत.