मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दारू प्यायचो, दरवाजाही तोडला होता पण तिने…”, श्वेता तिवारीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं घटस्फोटावरुन धक्कादायक खुलासे, बऱ्याच वर्षांनी…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 30, 2025 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Raja Chaudhary on Shweta Tiwari

“दारू प्यायचो, दरवाजाही तोडत होता पण तिने...”, श्वेता तिवारीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं घटस्फोटावरुन धक्कादायक खुलासे, बऱ्याच वर्षांनी...

छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक म्हणजे श्वेता तिवारी. श्वेताने आजवर मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कामाबरोबरचं तिचं खासगी आयुष्यही बरंच चर्चेत राहिलं. सुप्रसिद्ध अभिनेता राजा चौधरीबरोबर श्वेताचं पहिलं लग्न झालं. मात्र नात्यात कालांतराने वाद वाढल्यानंतर तिने राजाबरोबर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र दरम्यान श्वेताने राजावर शारीरिक तसेच मानसिक हिंसाचाराबाबत आरोप केले होते. आता बऱ्याच वर्षांनंतर राजाने हे सगळेच आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यावेळी नक्की काय घडलं होतं? याबाबत भाष्य केलं आहे. (Raja Chaudhary on Shweta Tiwari)

हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत राजाने अनेक खुलासे केले. श्वेता तिवारीवर कधी हात उचलला होता का? असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “कोणताच शारिरीक अत्याचार झाला नाही. १ ते २ वेळा मी तिच्या घराचा दरवाजा तोडला आहे. पण ते तिच्या मुर्खपणामुळे झालं होतं. मी घराच्या बाहेरच उभं राहावं, आतमध्येच येऊ नये असं तिला वाटत होतं. मला फक्त तिच्याशी बोलायचं होतं. बोलणं झाल्यानंतर मी तिथून निघूनच जाणार होतो. पण तिने मला भडकवण्याचं काम केलं. तिने तोंडावर दरवाजा बंद केला आणि भेटण्यासही नकार दिला. तेव्हा माझं डोकंच फिरलं. म्हणून बऱ्याचदा मी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसही त्यावेळी आले होते. पण मी तिच्यावर हात उचलला या सगळ्या खोट्या कथा आहेत”.

आणखी वाचा – शेफालीच्या अस्थी हृदयाशी धरुन ढसाढसा रडला पराग त्यागी, बायकोचं नसणं सहन होईना, व्हिडीओ पाहून चाहतेही भावुक

View this post on Instagram

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

पुढे तो म्हणाला, “मला खूप वाईट पद्धतीने सगळ्यांसमोर दाखवण्यात आलं. श्वेता तिवारीच्या नवऱ्याने तिला बेदम मारलं अशा हेडलाइनही देण्यात आल्या. श्वेताच्या नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असंही बातम्यामध्ये आलं. या सगळ्या गोष्टींमुळे ती अभिनेत्री झाली आणि मी विलन झालो. त्यादरम्यान ती खूप प्रसिद्धही होती. प्रेक्षकांची ती सगळ्यात आवडती अभिनेत्री होती. टीव्ही शो करत होती. त्यामुळे नेहमीच मला विलनच्या नजरेनेच पाहण्यात आलं”.

आणखी वाचा – सासरी रमली हिना खान, सासरच्या मंडळींकडून सेवा करुन घेताना दिसली अन्…; कुटुंबियांच्या साधेपणाने वेधलं लक्ष

दारू पिऊन पार्ट्यांमध्ये दंगा करण्यावरुनही राजाने भाष्य केलं. दारु पिऊन धिंगाणा करत असल्याचं त्याने स्वीकारलं. दारू, पार्टी यामधून बाहेर पडण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. चार ते आठ महिने रिहॅब सेंटरमध्येही राजा राहिला. त्यानंतर त्याने स्वतःला बदलायचं ठरवलं. खेळाडू वृत्तीने मुळेही बदलाव झाला असल्याचं राजाने सांगितलं. मात्र श्वेता सतत करत असलेले आरोप खोटे असल्याचे त्याने बऱ्याच वर्षांनी सांगितलं.

Tags: bollywood newsentertainment newsShweta Tiwari
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Nisha Rawal Married Life

२० तास वेदना, मृत बाळाला जन्म अन् नवऱ्याची सततची मारहाण; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केलेला धक्कादायक खुलासा, म्हणालेली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.