सोमवार, जून 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘येरे येरे पैसा ३’चं धमाकेदार गाणं प्रदर्शित, अमेय खोपकरांच्या लेकाचं चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल, पाहा व्हिडीओ

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 9, 2025 | 1:57 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Yere Yere Paisa 3 new song

‘येरे येरे पैसा ३’चं धमाकेदार गाणं प्रदर्शित, अमेय खोपकरांच्या लेकाचं चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल, पाहा व्हिडीओ

मराठीमध्ये आता नवनवीन चित्रपट येऊ घातले आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘येरे येरे पैसा ३’. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ‘येरे येरे पैसा ३’च्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षकांचा पाठिंबा आणि आवड पाहता चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच चित्रपटगहांमध्ये दाखल होणार आहे. ‘येरे येरे पैसा ३’च्या स्टारकास्टचीही सध्या हवा आहे. चित्रपटाचं कथानक नक्की काय असणार? याबाबतही चाहते उत्सुक आहेत. अशातच आता चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. त्याचीच जोरदार चर्चा रंगत आहे. काही तासांमध्येच गाण्याला हजारो व्ह्युज मिळाले आहेत. (Yere Yere Paisa 3 new song)

‘येरे येरे पैसा ३’च्या ट्रेलर आणि टायटल ट्रॅकला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. आता चित्रपटामधील ‘उडत गेला सोन्या’ गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं एका वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने सादर करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सनी आणि बबलीचे गोड प्रेम प्रेक्षकांनी अनुभवले होते. आता ‘येरे येरे पैसा ३’ मध्ये सनीचे लग्न दुसऱ्याच मुलीशी होत असल्याने बबली अस्वस्थ झाली आहे. बबली तिच्या मनातील भावना या गाण्यातून व्यक्त करताना दिसत आहे.

आणखी वाचा – Video : गरोदर चाहतीच्या बेबी बंपला हात लावत श्रेया घोषालने गायलं गाणं, बाळाची हालचाल सुरु झाली अन्…; सुंदर व्हिडीओ समोर

गाण्याला भावनिक टच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘जेन झी’ ब्रेकअप साँग पद्धतीचं हे गाणं आहे. शिवाय गाण्याचा ठेका प्रेक्षकांना थिरकायला लावणारा ठरेल. गाण्याची खासियत म्हणजे निर्माते अमेय खोपकर यांचा मुलगा ईशान अमेय खोपकरही या गाण्यात दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ईशानचे मराठी चित्रसृष्टीत पदार्पण केले आहे. तर गाण्यात चित्रपटातील इतर कलाकारांसह सोनाली खरेचीही झलक पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “वाईट झालं, रडत बसून…”, १५ वर्षांनंतर बायकोपासून विभक्त होताच संजीव सेठ यांचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाले, “जे काही झालं ते…”

सायली पंकज, रविंद्र खोमणे, राधा खुडे, सौरभ साळुंके, मुनव्वर अली, अपूर्वा निशाद व सावनी भट्ट यांच्या जबरदस्त आवाजातील या गाण्याला पंकज पडघन यांचे संगीत लाभले आहे. धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर आदी कलाकार ‘येरे येरे पैसा ३’मध्ये दिसतील. येत्या १८ जुलैला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.

Tags: entertainment newsmarathi actormarathi actressmarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली ‘साकव’ वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

जून 22, 2026 | 1:35 pm
Anushka Sarkate Mehendi Ceremony
Entertainment

मेहंदी है रचनेवाली! अनुष्का सरकटेच्या हातावर रंगली निखिलच्या नावाची मेहंदी, खास लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

जून 22, 2026 | 9:27 am
Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Next Post
Rajkummar Rao baby news

राजकुमार राव व पत्रलेखा आई बाबा होणार, लग्नाच्या चार वर्षानंतर गुडन्यूज, शेअर केली खास पोस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.