बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये ओळखली जाणारी श्रद्धा कपूर जरी अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी असली. मात्र तिच्या अभिनयावर चाहते प्रचंड प्रेम करतात, शिवाय ती जेव्हा जेव्हा स्पॉट होते, तेव्हा तेव्हा तिचा निरागसपणा व नम्र स्वभाव चाहत्यांसह नेटकऱ्यांना भावतो. (shraddha kapoor)
अशातच श्रद्धाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. ज्यात एक चाहता गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करतोय. मात्र जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा मात्र नेटकऱ्यांनी त्या चाहत्याला प्रचंड ट्रोल केलं आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर कामानिमित्त एअरपोर्टच्या दिशेने जाताना दिसत आहे. ती तिच्या गाडीतून खाली उतरताच एक चाहता तिच्यासाठी गुलाब घेऊन आला, आणि गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करताना या व्हिडिओमध्ये दिसतोय. यावेळी श्रद्धाही हसत हसत त्याच्या पुष्पगुच्छाचा स्विकार करत त्याच्याबरोबर हात मिळवतानाही दिसत आहे.
श्रद्धाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना आवडला असून काही नेटकऱ्यांना मात्र हा व्हिडिओ खटकला आहे. नेटकरी या व्हिडिओवर कमेंट्स करत त्या चाहत्याला खूप ट्रोल करत आहे. एक नेटकऱ्याने लिहिलंय, “अरे, हा लप्पू झिंगूसारखा मुलगा कुठून आला?”. तर दुसऱ्याने लिहिलंय, “भाऊ शाळेत जा, अभ्यास करा. इतक्या लहान वयात तो सेलिब्रिटींना प्रभावित करतोय.” (shraddha kapoor viral video)
पाहा श्रद्धाचा हा व्हायरल व्हिडिओ (shraddha kapoor viral video)
अभिनेत्री श्रद्धा कपूर काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या ‘तू झूठी, में मक्कर’ चित्रपट झळकली. नुकतंच अभिनेत्रीने ‘स्त्री २’ चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केलं आहे. जो ऑगस्ट २०२४ मध्ये रिलीज होणार आहे. (shraddha kapoor viral video)
हे देखील वाचा : “केवळ ५०० रुपयात काम ते उत्कृष्ट कॉमेडियन”,पाहा कसा आहे अभिनेता सुनील ग्रोव्हरचा संपूर्ण जीवन प्रवास